भाजप लोकसभा समन्वयकाचा थेट ठाकरे गटात प्रवेश

Direct entry of BJP Lok Sabha coordinator into Thackeray group

 

 

 

 

 

भाजप मोठा पक्ष आहे. तर तिथे कुठेतरी आपल्याला सामावून घेतलं जाईल. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला कुठे सामावून घेतलं नाही.

 

 

 

तिथे आमच्यासाठी जागा नव्हती. त्यांनी आमचा योग्य सन्मान करायला पाहिजे तो केला नाही, अशी खंत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या ॲड ललिता पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

 

भाजपच्या जळगाव लोकसभा समन्वयक असलेल्या ॲड ललिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

 

 

 

बाहेर पडण्यामागची भूमिका ॲड ललिता पाटील यांनी स्पष्ट केली आहे. पाच वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. मग आता आम्ही किती दिवस असं त्यांच्या मागे मागे राहायचं.

 

 

 

आमची पण वेळ निघून जायला नको म्हणून बाहेर पडण्याचा योग्य वेळी निर्णय घेतला, असं ॲड ललिता पाटील म्हणाल्या. भाजपकडूनही आपण तिकिटाची मागणी केली होती.

 

 

 

मात्र तिकडे आधीच दिग्गज माजी आमदार माजी खासदार हे रांगेत आहेत. त्यामुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही, हे कळल्यावर

 

 

 

पक्षातून बाहेर पडण्याची योग्य वेळ आली आहे. त्यामुळे बाहेर पडले, असं सुद्धा यावेळी ॲड ललिता पाटील यांनी सांगितले.

 

 

 

त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे जळगाव लोकसभेतील उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पक्षाकडून अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत.

 

 

 

त्यामुळे मातोश्रीवरून लिस्ट बाहेर पडेल जो कोणी उमेदवार असेल. त्याच्यासाठी काम करू. आपण जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटात गेलो नाही,

 

 

असं सुद्धा ॲड ललिता पाटील यांनी स्पष्ट केलं. सेना हा एकमेव असा पक्ष आहे की तळागाळातल्या माणसाला उचलून त्यांनी मोठं बनवलेलं आहे.

 

 

माणसाकडे सगळं असताना तर कोणी पण देतो, पण काही नसताना आणि जो प्रवाह बरोबर चालतो ना त्या प्रवाहामध्ये तर सगळेच असतात.

 

 

 

पण कधीतरी प्रवाहाच्या विरोधात जाऊन बघावं आणि तिथून संघर्ष करून बघावा, हे फक्त बाळासाहेबांचे शिवसैनिकच करू शकतात, याचा मला ठाम विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या.

 

 

 

त्या पुढे म्हणाल्या की, शिवसैनिक पेटवून उठलेला आहे. पेटून उठलेली मशाल त्यांच्या हातामध्ये आहे. तर मला विश्वास आहे की आमचे सगळे शिवसैनिक माझ्याबरोबर राहून आम्ही

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याचं काम करणार आहोत. बाकीच्यांचं जर का १२ वाजवायचे असतील तडीपार करायचा असेल तर दिस इज द राईट टाईम असं म्हणत मी योग्यवेळी बाहेर पडण्याचा

 

 

 

 

आणि शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याचे ॲड ललिता पाटील यांनी सांगितले. जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास घडवणार

 

 

आणि राज्यात सगळ्या ठिकाणी आमची मशाल पेटणार, या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल एक नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *