मनसेच्या महिला नेत्याच्या ट्विटने महायुतीत खळबळ

Excitement in the Grand Alliance with the tweet of the MNS woman leader

 

 

 

 

दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या नेत्यांनीच बड्या नेत्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला.

 

 

 

 

यानंतरही काँग्रेसला धक्क्यावर धक्के सुरू आहेत. संजय निरुपम आणि राजू वाघमारे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसची राज्यात चांगलीच पडझड झाली आहे.

 

 

 

 

निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करत असून, त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

पण आता लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. संजय निरुपम यांच्या पाठोपाठ आता काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या रवींद्र वायकरांच्या उमेदवारीलाही मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे.

 

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात संजय निरुपम यांच्यासह रवींद्र वायकरांच्या नावांची चर्चा आहे.

 

 

 

 

वायकरांचा पक्षप्रवेश हा लोकसभा उमेदवारीसाठीच असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनसेनं वायकरांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटद्वारे वायकरांना उमेदवारी देण्यावरून आक्षेप घेतला आहे.

 

 

 

 

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये निरुपम यांचा महाराष्ट्रद्रोही तर रवींद्र वायकर यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केला आहे.

 

 

 

त्या म्हणाल्या, ‘मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे.

 

 

 

ठाकरे म्हणाल्या, इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेल्या महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरांसारख्या

 

 

 

 

उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या ट्विटमुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *