भाजप आमदाराने दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

BJP MLA warned the Chief Minister

 

 

 

 

राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाचा आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 

 

 

धनगर आरक्षणासंदर्भात तातडीने पावले उचलली नाहीत तर समाजाच्या रोषाला आणि आंदोलनाला सामोरे जायची तयारी ठेवा, अशा इशाराच गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

 

 

 

तसेच एकनाथ शिंदे हे फक्त विशिष्ट समजासाठीच वाट्टेल ते करायची तयारी दाखवतात, अशी धारण बहुजन समाजात तयार होऊ लागली आहे.

 

 

 

त्यामुळे तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

 

गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याने सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

 

 

फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे, अशी धारणा बहुजन समाजात तयार होत आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात.

 

 

 

आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

 

 

 

 

आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते.

 

 

आज ही मुदत संपली आहे. तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. त्यामुळे आपण फक्त विशिष्ट समाजासाठी तत्परता दाखवत असल्याची धारण बहुजन समाजात तयार होत आहे.

 

 

 

 

आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला.आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे. समित्या गठित करुन धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही.

 

 

 

ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा.

 

 

अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला व आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.

 

 

 

हा इशारा राज्यातील तमाम ५ कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे, असेही पडळकर यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *