पाहा राहुल गांधींकडे किती संपत्ती ?

Look how much wealth Rahul Gandhi has

 

 

 

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

 

 

 

राहुल गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे २० कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

 

 

वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.

 

 

 

 

राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ५५ हजार रुपये रोख रक्कम, २६ लाखांचे बँक डिपॉझिट तर शेअर बाजारात सव्वा ४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

 

 

 

त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याकडे ४ लाखांचे सोन्याचे दागिने, हरियाणातील गुरुग्राममध्ये ९ कोटी रुपये किमतीचे कार्यालय आहे. तसेच राहुल गांधी यांच्याकडे स्वतःची कार नसल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 

 

दरम्यान, केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल यांच्या विरोधात

 

 

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) नेत्या ॲनी राजा रिंगणात आहेत. ॲनी राजा या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत.

 

 

 

 

त्या सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी आहेत. ॲनी राजा यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *