तीन खासदारांना उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये उमेदवारीवरून अस्वस्थता

As three MPs did not get candidature, Shinde group MLAs are nervous about the candidature

 

 

 

 

 

महाराष्ट्रात भाजपच्या दबावामुळे तीन खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत याचेच पडसाद उमटून उमेदवारी नाकारली जाईल,

 

 

 

अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये पसरली आहे. पक्षाच्या आमदारांमध्ये अशीच चलबिचल सुरू राहिल्यास शिंदे यांच्यासाठी

 

 

 

ही बाब त्रासदायक ठरू शकते. शिंदे यांनी भाजपच्या दबावाला बळी पडू नये, अशी भूमिका पक्षातील नेत्यांकडून मांडली जात आहे.

 

 

 

भाजपच्या दबावामुळे हिंगोलीत खासदार हेमंत पाटील यांनी जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली. खासदार पाटील यांची उमेदवारी दोन आठवड्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती.

 

 

 

 

पण पाटील उमेदवार असल्यास निवडून येणार नाहीत, असे भाजप नेत्यांनी सर्वेक्षणाच्या आकडेवारीच्या आधारे लक्षात आणून दिल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांची उमेदवारी रद्द केली.

 

 

 

 

रामटेकमध्येही भाजपच्या दबावामुळे काँग्रेसच्या आमदाराला उमेदवारी देण्याची वेळ शिंदे यांच्यावर आली. यवतमाळ-वाशीमध्ये भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली.

 

 

 

शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदारांनी शिंदे यांना साथ दिली होती. यापैकी तीन विद्यमान खासदारांना शिंदे यांनी उमेदवारी नाकारली आहे.

 

 

 

 

लोकसभेसाठी मोठे मतदारसंघ असताना भाजपच्या दबावापुढे शिंदे झुकले. यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय होईल, अशी भीती आमदारांना सतावू लागली आहे.

 

 

 

 

लोकसभेत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा खरोखरीच मिळाल्यास भाजपला मित्र पक्षांची गरज भासणार नाही. तशा परिस्थितीत भाजप शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांवर दावा करू शकते, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांना आहे.

 

 

 

 

भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार बदलण्यात येत असल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर अवलंबून राहून निर्णय घेत राहिलो तर कार्यकर्त्यांची गरजच काय

 

 

 

 

हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांंनी केलेला सवाल बोलका आहे. पक्षप्रमुख कोणत्याही निर्णयावर ठाम राहणे हे शिंदे यांच्याकडून अपेक्षित आहे.

 

 

 

पण मित्र पक्षाच्या दबावाला झुकून निर्णय घेऊ लागले तर पक्षात कोणीच त्यांच्याबरोबर राहणार नाही, अशी प्रतिक्रिया एका आमदाराने व्यक्त केली.

 

 

 

 

मुंबईतील एका आमदाराने भाजपच्या दबावामुळे आपल्याला उमेदवारी नाकारल्यास सरळ अपक्ष लढण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत पक्षाने काही विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली असली तरी त्यांचे योग्य ते राजकीय पुनर्वसन करण्याची हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

 

 

दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपा, मिंधे गट आणि राष्ट्रवादीची गद्दार गँग यांना उमेदवारच मिळत नाहीयेत.

 

 

 

 

जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजपा आणि मिंधे गटाला उमेदवारच मिळत नाहीत असं चित्र आहे.” अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.

 

 

 

 

महाविकास आघाडीत कुठलाही तिढा नाही. मुंबईतली एक जागा राहिली आहे त्याबद्दल आमची चर्चा सुरु आहे. काँग्रेसला ती जागा लढवायची नसेल तर आम्ही तिथे लढवू आणि जिंकून येऊ.

 

 

 

जेव्हा आघाडी असते तेव्हा जागांची अदलाबदल होतेच. बऱ्याच गोष्टींवर चर्चा होते. इंडियन एक्स्प्रेसने काल जो अहवाल समोर आणला आहे ती गोष्ट नवी नाही.

 

 

 

भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये नेत्यांना टाकलं जातं आणि उजळले की पक्षात घेतलं जातं. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली आहे. महाराष्ट्रात १२ लोक असे आहेत जे मोदींचे बारा वाजणार आहेत.

 

 

 

कल्याण मतदारसंघात पैशांची मस्ती असलेल्या उमेदवारांना वैशाली दरेकर ही एक सामान्य गृहिणी पराभूत करेल. कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चालणार नाही.

 

 

 

 

आम्ही नारायण राणेंचा पराभव केला होता हे सगळ्यांना माहीत आहे. श्रीकांत शिंदे बच्चा आहे. आधी हिंमत असेल तर कल्याण आणि ठाण्यातली उमेदवारी जाहीर करुन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना दिलं आहे.

 

 

 

ज्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केलं होतं, त्यांचं तिकिट कापण्यात आलं. अजून काही लोक आहेत ज्यांची तिकिटं कापली जाणार आहे. मग या लोकांनी त्यांच्यासह (भाजपा) जाऊन मिळवलं तरी काय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

 

 

 

 

पक्षासह गद्दारी केली, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्यावेळेस म्हणाले होते एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन असं तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले होते.

 

 

 

 

 

तेच आता उमेदवारांना तिकिटही देऊ शकत नाहीत. हे हाल मिंधे गटाचे झाले आहेत. आता ४० गद्दारांनी विचार करावा की विधानसभेत नक्की काय होणार? कारण एक एकेकाची विकेट पडताना दिसू लागली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *