अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

The big leader of Ajit Pawar's Rasirwadi preparing to leave the party?

 

 

 

 

राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या १९ तारखेला असून यासाठी आता फक्त ५ दिवस शिल्लक आहेत.

 

 

 

 

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या गटातील बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजलं आहे.

 

 

 

 

अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून संजीव राजे निंबाळकर आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

 

 

आज संध्याकाळी संजीव राजे निंबाळकर यांचा शरद पवार गटात पक्ष पवेश होण्याची शक्यता आहे. संजीव निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे पुतणे आहेत.

 

 

 

शरद पवार गटाकडून अजित पवार गट तसेच भाजपलाही धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे देखील

 

 

 

आज सायंकाळी राष्ट्रवादीत दाखल होतील अशी शक्यता आहे. आज संध्याकाळीच त्यांचा पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा सुरूये.

 

 

 

 

धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदार संघातून इच्छुक उमेदवार आहेत. मात्र भाजपने रणजीत सिंह निंबाळकर यांना महायुतीची उमदेवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते.

 

 

 

धैर्यशील मोहिते पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट राजीनामा पत्र पाठवले आहे. मढामध्ये अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही.

 

 

 

 

त्यामुळे महाविकास आघाडीतून माढाची जागा धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर

 

 

 

भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. संजीव राजे निंबाळकर यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केल्यास अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *