भाजप खासदाराच्या संविधानावरील वक्तव्यामुळे पुन्हा वादळ; काँग्रेसने VIDEO केला शेअर
Storm again due to BJP MP's statement on constitution; Congress shared the VIDEO

भाजपच्या आणखी एका नेत्याने संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजपचे फैजाबादमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार लल्लू सिंह
यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.
देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे, पण संविधानात दुरुस्ती करण्यासाठी किंवा संविधान बदलण्यासाठी दोन तृतियांश जागांची आवश्यकता आहे.
त्यामुळे हा नियमही बदलावा लागेल आणि संविधान देखील बदलावं लागेल, असं वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केलंय.
काँग्रेसने या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे नेता पवन खेरा यांनी यासंदर्भात लल्लू सिंह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणालेत की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की,
स्वत: बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत. पण, आता अयोध्येतील भाजपचे विद्यमान खासदार लल्लू सिंह उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत.
४०० जागांची जनतेला मागणी करत आहेत. मोदी यांना मनापासून माफ करु शकतील का? असा सवाल पवन खेरा यांनी केलाय.
कर्नाटकातील भाजप नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देखील संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संविधान बदलण्यासाठी ४०० पेक्षा जास्त जागांची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले होते.
त्यानंतर भाजपकडून हेगडे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपचे आणखी एक नेते ज्योती मिर्धा यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपने त्यांना राजस्थानच्या नागौरमधून तिकीट दिलं आहे.
फैजाबाद लोकसभा जागेवरुन लल्लू सिंह भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांना निवडणूक लढणार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
१९ एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल लागेल.
PDA भाजपा को मिलकर हराएगा क्योंकि भाजपा पिछड़ों, दलितों, अल्पसंख्यकों को मिले आरक्षण को, नया संविधान बनाकर ख़त्म करना चाहती है। भाजपा जनता की सेवा या कल्याण के लिए नहीं बल्कि बाबा साहेब भीमराव अम्बेडकर जी द्वारा बनाए संविधान को बदलने के लिए जीतना चाहती है। सदियों से 4-5%… pic.twitter.com/bvFf1AioXX
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 14, 2024