समीर दुधगावकर यांचा जाहीरनामा;पाहा मतदारसंघाच्या विकासासाठी काय करणार ?
Manifesto of Sameer Dudhgaonkar; see what is for the development of the constituency

परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.जाहीरनाम्यात
त्यांनी आरक्षणाबाबत जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला आहे. कुणबी मराठा आरक्षण आंदोलन संसदेत तीव्रतेने करणार, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रकरणे भूमिका मांडणार,
तसेच आशा स्वयंसेविका, परिचारिका, अंगणवाडी ताई यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार, जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी पुढाकार घेणार,
शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी, शेतकऱ्यांची खाते बियाणांमधील फसवणूक थांबवणे तसेच किमती स्थिर ठेवणे,हमीभाव पिक विमा मिळावा
यासाठी प्रयत्न करणार,शेतीवर आधारित उद्योग ग्रामीण भागात सुरू करण्यासाठी प्राधान्य देणार, महामार्गासारख्या प्रकल्पात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार,
ऊस उत्पादकांना योग्य एफ आर पी देऊन सहकार क्षेत्र मजबूत करावी यासाठी आवाज उठवणार, मराठवाड्यातील छोट्या मोठ्या नद्या प्रभावीत होण्यासाठी असलेले जलस्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार,
महिला बचत गट आणि लघुउद्योग यांना बाजारपेठ मिळवून देऊन त्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करणार, आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणार,
दिव्यांगांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, माजी मंत्री, माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांनी पुढाकार घेऊन मंजुरी मिळवलेल्या परंतु अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेणार,
परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी बायपास,परभणी मनमाड रेल्वे विद्युतीकरण, पूर्णा स्टेशन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे काम पूर्ण करणार. परभणी लोकसभेतील गावे आणि शहरे धुळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार,
ऑक्सिजन पार्क ची स्थापना करून नागरिकांना शुद्ध हवा देणार, प्रत्येक मोठ्या गावात जॉगिंग ट्रॅक देणार, स्थानिक कलाकार यांच्यासाठी सांस्कृतिक महत्त्वाचे आयोजन करणार,
खासदारकीचा उपयोग स्वतःच्या लाभासाठी न करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करणार, सत्याची कास धरून योग्य ते मुद्दे
संसदेत काही उचलणा भूमिपुत्रांचा सन्मान वाढवणार असे आश्वासन दुधगावकर यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले आहे.
जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, व्यंकटेश काळे, ज्येष्ठ पत्रकार धाराजी भुसारे, भानुदासराव शिंदे, दादाराव काळे, शेषराव मोहिते,प्रा. विजय राऊत आदी उपस्थित होते.