समीर दुधगावकरांचा प्रचार धुमधडाक्यात सुरु
Sameer Dudhgaonkar's campaign started in full swing
सध्या जिल्ह्यात परभणी लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांच्यामुळे लढत चुरशीची होत असून गावोगावी त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता इतर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ग्रामस्थ दुधगावकरांचे स्वागत करत आहेत.
जिल्ह्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या समीर दुधगावकर यांनी परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात ते मैदानात उतरले.
आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेत व वडील माजी मंत्री, माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांच्या साथीने थेट बलाढ्य उमेदवारांसमोर आपला लढा सुरू केला आहे.
सध्या समीर दुधगावकर यांचा प्रचार मतदारसंघातील गावागावात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत सुरु आहे.या भेटीत मतदार दुधगावकरांची आपुलकीने विचारपूस करत आहेत.
मतदारसंघातील जालना जिल्ह्यात असलेल्या घनसावंगी, परतुर या तालुक्यात त्यांचे स्वागत झाले. रविवारी गंगाखेड तालुक्यातील इसाद, खंडाळी, राणीसावरगाव या भागात दुधगावकरांनी दौरा केला.ग्रामस्थांनी दुधगावकरांचे स्वागत केले.
जिल्ह्यातील राजकारणातील ज्येष्ठ नेते राजकीय गुरु असलेले माजी मंत्री, खासदार, शिक्षण संस्था चालक अशा विविध पदांवर कार्य केलेले कार्यकारी गणेशराव दुधगावकर उर्फ बापूसाहेब
हे स्वतः पुत्र समीर यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. पन्नास वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत मुरब्बी असलेले बापूसाहेब सध्या जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधत आहेत . विविध पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना भेटत आहेत.