नरेंद्र मोदींकडून कार्यकर्त्यांना झापाझापी ! काय घडले कारण?

Activists are encouraged by Narendra Modi

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर शहरात मतदान कमी का झाले असे विचारत कार्यकर्त्यांना झापाझापी करण्यात आली आहे .

 

 

 

अशी विचारणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केली. प्रचंड ऊन आणि प्रशासनाच्या संथ कारभाराकडे बोट दखवून कार्यकर्त्यांनी यातून आपली सुटका करून घेतली.

 

 

 

 

मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये मुक्कामाला होते. वर्धा लोकसभा मतदासंघात प्रचार सभा घेण्यासाठी ते जबलपूर येथून विदर्भात आले होते. रात्रभर राजभवनवर त्यांनी मुक्काम केला.

 

 

 

 

 

सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ते नांदडेकडे रवाना झाले. तत्पूर्वी राजभवनवर १५ पदाधिकारी त्यांना भेटले. त्यानंतर इतर पंधरा पदाधिकाऱ्यांची नागपूर विमानतळावर मोदी यांनी भेट घेतली.

 

 

 

 

 

भेट घेणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी महापौर संदीप जोशी, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा समावेश होता.

 

 

 

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघात ७५ टक्के मतदान होऊ शकले नाही. रामटेकच्या तुलनेत नागपूरमध्ये कमी मतदान झाले.

 

 

 

 

नागपूरमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी लढत असताना फक्त ५४ टक्के मतदान झाले. भाजप आणि प्रशासनाने ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ठ्य ठेवले होते.

 

 

 

असे असतानाही नेहमी प्रमाणेच सरासरी मतदान झाले. प्रशासनाच्या मोहिमेचा आणि भाजपच्या प्रयत्नांचा फारसा असर मतदानाच्या आकडेवारीवर पडला नाही.

 

 

 

 

गडकरी यांनी ७५ टक्के मतदान होईल या अपेक्षेने पाच लाखांच्या मताधिक्याने निवडूण येणार असल्याचा दावा केला होता.

 

 

 

आज पंतप्रधान जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये मतदानचा टक्का कमी का अशी थेट विचारणा केली. काल तापमान ४१ अंश सेल्सिअस होते.

 

 

 

प्रचंड ऊन व उकाड्यामुळे बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत. याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या. संथ गतीने मतदान होत असल्याने अनेकजण मतदान न करताच निघून गेले.

 

 

 

 

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. हजारो मतदारांची नावे गहाळ झाली असे कारण मोदी यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिले.

 

 

 

 

 

रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे मोदी यांची सभा झाली होती. रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी ते आले होते.

 

 

 

 

त्यामुळे रामटेकच्या निकालाची त्यांना उत्सुकता आहे. रामटेकमध्ये मतदान समाधानकारक झाले आहे. त्यामुळे येथून कोण जिंकणार अशी विचारणा

 

 

 

मोदी यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना केली. महायुतीचा उमेदवार जिंकणार असल्याचे सांगून भाजपचे पदाधिकारी मोकळे झाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *