महाविकास आघाडी किती जागा जिंकणार ?;राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितला आकडा
How many seats will the Mahavikas Aghadi win; the figure given by the leader of the Nationalists
देशात शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचविण्यासाठी लाट निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी 32 ते 35 जागा जिंकेल,
असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी ते शहरात आले होते.
जयंत पाटील l म्हणाले, आमच्याकडे नेते जास्त नाहीत, पण जनता आमच्याकडे आहे. सलग पंधरा वर्षे भाजपची सत्ता असताना ते जिल्ह्याचा विकास करू शकले नाहीत.
त्यांची अकृतीशीलता असून भाजप जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या जबाबदारी पेलू शकले नसल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
जीएसटीने शेतकरी शेतमजूर आणि सामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातून महाविकास मुक्त करू शकते असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
आतापर्यंत देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी केलेल्या विकासाला याला शून्य ठरविण्याचे कटकारस्थान मोदी करीत असल्याचा
आरोप त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांनी टीकाटिपणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले
खासदार रजनी पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे , शिवसेना उबाठा किशोर पोतदार, माजी मंत्री बदामराव पंडित,
माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार सय्यद सलिम, माजी आमदार सुनिल धांडे, माजी आमदार सिराज देशमुख, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष महेबूब शेख, बबन गित्ते उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, या अकृतीशील असून गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात त्यांनी काय कामं केली हे लोकांसमोर आणणार असून
त्यांच्यामुळेच बीड जिल्हा मागास राहिल्याचा आरोपही त्यांनी केला. बीडची निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीमध्ये जे नेते आणि आमदार आपल्या सोबत होते ते आता नाहीत, त्यामुळे नवीन नेतृत्वांना संधी देणार असल्याचं जाहीर केलं.
तर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे म्हणाले, प्रीतम मुंडे या रेल्वेत बसून फॉर्म भरण्यासाठी येणार होत्या. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासमोरचं ताट ओढून घेतलं.
त्यांच्यावर कुणाचा दबाव होता हे त्यांनाच माहीत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये जे नेते आणि आमदार आपल्या सोबत होते ते आता नाहीत, त्यामुळे नवीन नेतृत्वांना संधी देणार असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले.