लोकसभा निवडणूक;हिंगोली जिल्ह्यात प्राचार्यावर गुन्हा दाखल

Lok Sabha election; Case registered against principal in Hingoli district

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनातील कर्मचारी तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

 

मात्र अनेकजण या कामातून सुटका मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काहीजण निष्काळजीपणा करत आहेत. अशाच प्रकारे निष्काळजीपणा करणे एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला भोवला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

लोकसभा निवडकीसाठी पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

 

 

 

मात्र निवडणुकीच्या कामातून सुटका मिळविण्यासाठी वेगवेगळी करणे दाखविली जात आहेत. अशांवर निवडणूक आयोग लाख ठेवून

 

 

 

असून यात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. निवडणूक आयोगाकडून हि कारवाई केली जात आहे.

 

 

 

त्यानुसार हिंगोलीमध्ये लोकसभा निवडणुक प्रक्रियेत निवडणूक विभागाने केंद्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या नंतर देखील कामात हलगर्जीपणा करणाऱ्या

 

 

 

 

सेनगाव महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. एस. जी. तळणीकर असे गुन्हा दाखल करण्यात

 

 

 

आलेल्या प्राचार्यांचे नाव असून हे प्राचार्य सेनगाव तालुक्यातील तोष्णीवाल महाविद्यालयात कर्तव्य बजावत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *