काँग्रेसच्या मोठ्या नेत्यावर निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

Crime against senior Congress leader on Election Commission complaint

 

 

 

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार

 

 

 

 

ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावर केलेली टीका त्यांना भोवली आहे. निवडणूक आयोगाकडून झालेल्या तक्रारीच्या आधारावर सीताबर्डी पोलिस ठाण्यात वडेट्टीवार यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

निकम यांच्यावर टीका करताना वडेट्टीवार यांनी काही आरोप केले होते. त्यात मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलातून लागल्याचे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते. या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला होता.

 

 

 

 

तसेच वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपा विधी आघाडी नागपूरतर्फे तक्रार करण्यात आली होती. विधी आघाडी नागपूर महानगरचे अध्यक्ष ॲड. परीक्षेत मोहिते यांनी याबाबत सीताबर्डी पोलिसांत ही तक्रार नोंदवली होती.

 

 

 

 

याखेरीज बुधवारी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तसेच आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडनेही वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी शुक्रवारी वडेट्टीवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

 

 

 

 

आम्हाला ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि ‘इन्कमटॅक्स’चा धाक दाखवत आहात, उद्या आमचाच दिवस येणार आहे, चित्र बदलल्यावर

 

 

 

 

तुमची काय अवस्था होईल याची जाणीव ठेवा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षावर शुक्रवारी टीका केली.

 

 

 

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार खोटे बोलतात.

 

 

 

 

महिला खेळाडूंचे शोषण करणाऱ्या ब्रिजभूषणच्या मुलाला तिकीट देता. तुम्हाला चारशे जागा कशासाठी पाहिजेत, याचा अर्थ तुम्ही घटना बदलणार आहात, आता ही जुमलेबाजी चालणार नाही. लोकांनीच ठरवले आहे, राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत.

 

 

 

 

खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजेश राठोड, आमदार राजेश टोपे, शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे, डॉ. निसार अहेमद, शिराळे गुरूजी यांची भाषणे झाली.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *