इराणच्या राष्ट्राध्यक्षांचं हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये इस्राईचा हात ?

The hand of Israel in the helicopter crash of the president of Iran?

 

 

 

 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्षांचं हेलिकॉप्टर १९ मे रोजी सायंकाळी कोसळलं होतं.

 

 

 

अजरबैझानमध्ये एका डॅमच्या उद्घाटनासाठी ते गेले होते. तरबेज शहराच्या दिशेने जात असताना हेलिकॉप्टर कोसळलं. जिथं ही दुर्घटना घडली तो दुर्गम आणि घनदाट जंगलाचा भाग आहे. तिथं धुकं असल्यानं व्हिजीबिलिटी ५ मीटर पेक्षा जास्त नव्हती.

 

 

 

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण ३ हेलिकॉप्टर होते. इतर दोन्ही हेलिकॉप्टर सुखरूप पोहोचले पण राष्ट्राध्यक्षांचेच हेलिकॉप्टर कोसळले.

 

 

 

 

राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरही यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे.

 

 

 

 

अमेरिकेतील सिनेटर चक शूमर यांनी म्हटलं की, गुप्तचर संस्थांशी चर्चा झाली. आतापर्यंत तरी यात कोणत्याही कटाची शंका किंवा पुरावा आढळून आलेला नाही. अमेरिकेचा परराष्ट्र विभागसुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे.

 

 

 

इराणचं इस्रायलसोबत शत्रूत्व आहे. दोन्ही देशांचा वाद ५० वर्षे जुना आहे. त्यातच नुकतंच इस्रायलकडून गाझावर करण्यात आलेल्या हल्ल्याने नवा वाद उफाळून आला आहे.

 

 

 

 

 

गेल्या महिन्यात इराणने इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोन हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने बदला घेऊ असा इशारा दिला. इस्रायलने हल्ला केल्यानंतर मिडल इस्टमध्ये नव्या लढाईची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

 

 

 

 

रईसी हे अजरबैझानमध्ये डॅमच्या उद्घाटनासाठी गेले होते. अजरबैझानचं इस्रायलसोबत इंटेलिजन्स कम्युनिकेशन आहे. दोघेही एकमेकांशी इंटेलिजन्स शेअर करतात.

 

 

 

 

इराण आणि अजरबैझान हे दोन्ही शिया पंथीय देश आहेत. अजरबैझान बराचसा धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे दोन्ही देशात कटुतासुद्धा आहे.

 

 

 

 

अजरबैजानची इस्रायलला खूपच मदत मिळाली आहे. अर्मेनियाशी लढाई झाली तेव्हा अजरबैझानच्या बाजूने इस्रायल उभा राहिले.

 

 

 

 

इस्रायलचं इराणमध्ये हेरगिरीचं नेटवर्क पसरलं असून त्यात अजरबैझानची मोठी भूमिका आहे. त्यामुळे हत्येच्या कटाची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

 

रईसी हेलिकॉप्टरने जात असताना वातावरण खराब असल्याची माहिती मिळाली होती. तरीही पायलटने हेलिकॉप्टर पुढे का नेले? तिथून परत का नाही आले? दोन्ही हेलिकॉप्टर सुरक्षित उतरली,

 

 

 

 

मग ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष होते तेच हेलिकॉप्टर कसं दुर्घटनाग्रस्त झालं? हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळलं असलं तरी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *