Exit Poll ;महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघांत कोण जिंकणार कोण हरणार ?;पाहा सविस्तर

Who will win and who will lose in which constituencies in Maharashtra?; See details

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीचा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शनिवारी एग्झिट पोलचे निकाल आले. विविध नऊ संस्थांनी लोकसभेच्या सर्व ५४३ जागांचे एग्झिट पोल जाहीर केले.

 

 

 

 

त्यातील एक्सिस माय इंडिया, सीएनएक्स आणि चाणक्याच्या एग्झिट पोलने इंडिया आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. या एग्झिटपोल नुसार एनडीए फक्त बहुमतच मिळवत नाही तर घोषणेप्रमाणे ‘400 पार’ जात आहे.

 

 

 

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे नऊच्या नऊ एग्झिट पोलने दाखवले आहे. एग्झिट पोलची आकडेवारीनुसार

 

 

 

चार जून रोजी निकाल आला तर नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘400 पार’ ची घोषणा केली होती. त्यानंतर आता तीन सर्व्हेमध्ये भाजप+ ला 400 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहे.

 

 

 

 

सन 2019 मध्ये भाजपने 303 जागांवर विजय मिळवला होता तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 53 त्यांच्या सहयोगी पक्षाला 38 जागेवर विजय मिळवला होता.

 

 

 

 

महाराष्ट्रातील सर्वच एग्झिट पोलने महायुतीला धक्का दिला आहे. महायुतीचे 41+ चे स्वप्न एकाही एग्झिटपोलनुसार प्रत्यक्षात उतरत नाही. महायुतीला सर्वाधिक जागा जनकी बात संस्थेने दिल्या आहे.

 

 

 

 

या संस्थेनुसार महायुतीला 34 – 41 जागा मिळण्याची शक्यता आहे. या संस्थेने महाविकास आघाडीला 9 ते 16 जागा दिल्या आहेत. महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा सी वोटर या संस्थेने दिल्या आहेत.

 

 

 

या संस्थेने महाविकास आघाडीचा 23-25 जागांवर विजय होणार असल्याचे म्हटले आहे. महायुतीला 22-26 जागा या संस्थेने दाखवल्या आहेत.

 

 

 

 

 

‘टीव्ही 9 मराठी’च्या एग्झिट पोलनुसार राज्यात ही असेल शक्यता
1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट
2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट

 

 

 

3) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट
4) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट

 

 

 

5) ठाणे – राजन विचारे – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट
6) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट

 

 

 

7) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट
8) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट

 

 

 

 

9) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट
10) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट

 

 

 

11) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट
12) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट

 

 

 

13) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट
14) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी

 

 

15) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी
16) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस

 

 

 

17) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उज्वल निकम – भाजप
18) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस

 

 

 

19) धुळे – सुभाष भामरे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस
20) जालना – रावसाहेब दानवे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस

 

 

 

21) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप
22) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस

 

 

23) अकोला – अनुप धोत्रे – भाजप विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
24) अमरावती – नवनीत राणा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस

 

 

 

25) नागपूर – नितीन गडकरी – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
26) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)

 

 

 

27) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
28) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप

 

 

 

29) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
30) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध राम सातपुते – भाजप

 

 

 

31) भिवंडी – कपिल पाटील – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट
32) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप

 

 

 

33) रावेर – रक्षा खडसे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
34) बीड – पंकजा मुंडे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट

 

 

 

35) वर्धा – रामदास तडस – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अमर काळे – पवार
36) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप

 

 

 

37) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप
38) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुजय विखे पाटील – भाजप

 

 

 

39) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप
40) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे

 

 

41) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट
42) जळगाव – स्मिता वाघ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट

 

 

 

43) सांगली – संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (जिंकण्याची शक्यता)
44) रायगड – अनंत गीते – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी

 

 

 

 

45) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी
46) परभणी – संजय जाधव – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी

 

 

 

 

47) रामटेक – राजू पारवे – शिवसेना (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
48) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजय मंडलिक – शिवेसना

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *