असा करा लाडकी बहीण योजनेचा अर्ज आला

The application for Kara Ladaki Bahin Yojana came

 

 

 

 

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार आणि प्रसार सुरु आहे. या योजनेचे विरोधकही स्वागत करत असताना महायुतीने विरोधाकांना कोंडीत पकडले आहे.

 

 

 

महाराष्ट्र सरकारने या योजनाचा अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

 

 

 

अजित पवार आणि आदिती तटकरे यांचा फोटो आहे. अर्जावर महायुतीच्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे इतर पक्षातील नेत्यांची अडचण होणार आहे.

 

 

 

 

कारण या योजनेसाठी इतर पक्षातील नेतेही शिबिर लावण्याची तयारी करत आहे. योजनेसाठी घरी बसून अर्ज करता येणार आहे.

 

 

 

 

पात्र महिला योजनेसाठी घरी बसूनच ऑनलाइन अर्ज करु शकतात. त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा पीडीएफ अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे.

 

 

 

त्यात आपले नाव, पत्ता, बँकेची माहिती, आधार कार्ड नंबर आणि इतर सर्व गोष्टी भरव्या लागणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुन्हा वेबसाइटवर अपलोड करावा लागणार आहे.

 

 

 

 

बँके खाते देताना ज्या खात्यात तुम्हाला रक्कम हवी आहे, तेच खाते द्यावे लागणार आहे. त्यात बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव,

 

 

बँक खाता क्रमांक, बँकेचा आयएपएससी कोड भरावा लागणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे आधार त्या बँक खात्याशी लिंक हवे.

 

 

 

 

 

शासनाने या योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत ॲप’ सुरु केले आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

 

 

 

योजनेचा लाभ १ जुलैपासूनच मिळणार आहे. तसेच तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे.

 

 

 

 

ॲपवरुन अशी भरा माहिती
ॲप डाऊनलोड झाल्यावर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करा.
तुमचे नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा.

 

 

 

योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये ती माहिती भरा.
मुख्यमंत्री ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स भरा.

 

 

 

अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
त्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा.
अर्ज भरून पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येतो.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *