एक्झिट पोलवर सोनिया गांधीची पहिली प्रतिक्रिया ,म्हणाल्या….
Sonia Gandhi's first reaction to the exit poll, said...

लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अवघे काही तास उरले आहेत. मात्र, एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे.
मात्र, इंडिया आघाडीला एक्झिट पोल मान्य नाहीयेत. स्वत: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याला संयम ठेवावा लागेल.
वाट पाहावी लागेल. फक्त संयम ठेवा आणि मग पाहा. लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या उलट असतील याची आम्हाला पूर्ण आशा आहे,
असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच एक्झिट पोल आल्यानंतर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व आलं आहे.
एक्झिट पोल आले आहेत. त्यात मोदी सरकार तिसऱ्यांदा येत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, इंडिया आघाडीचे नेते एक्झिट पोल मानायला तयार नाहीत.
रविवारी याबाबत राहुल गांधी यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी हे एक्झिट पोल नाहीत, तर मोदी पोल आहेत, असं म्हटलं होतं. आमची सत्ता येईल.
आम्हाला विश्वास आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया आल्यानंतर उद्या नेमकं काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
TV9 च्या एक्झिट पोलमध्ये 543 जागांपैकी भाजप आघाडीला 346 जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळताना दिसत आहे.
इतर पक्षांना 35 जागा जातील अशी आशा आहे. मतांच्या टक्केवारीवर नजर मारल्यास भाजपच्या मताची टक्केवारी वाढताना दिसत आहे. भाजप आणि एनडीएला 47.28 टक्के मते मिळताना दिसत आहेत.
तर इंडिआ आघाडीला 36.03 टक्के मते मिळताना दिसत आहेत. इतरांना मिळून 16.69 टक्के मते मिळताना दिसत आहेत.
इतर एजन्सीज आणि न्यूज चॅनलच्या सर्व्हेतही अशाच प्रकारचे आकडे दिसत आहेत. परंतु हे पोल्स विरोधी पक्षांनी नाकारले आहेत. 4 जून रोजीचा निकाल आमच्या बाजूने येईल असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
इंडिया आघाडीने एका पत्रकार परिषदेत आकडे शेअर केले होते. आम्हाला 295 जागा मिळतील असा दावा इंडिया आघाडीकडून केला जात आहे.
तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 40-40 जागा मिळतील असा दावा इंडिया आघाडीकडून केला जात आहे.