नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतच्या थोबाडीत लगावली;पाहा VIDEO

Newly elected MP Kangana Ranawat's slap; see VIDEO

 

 

 

 

अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंगना राणावत नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे.

 

 

 

यानंतर कंगना आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता

 

 

 

तिच्या कानशिलात लगावण्यात आल्याची घटना समोर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे.

 

 

 

महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगनाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. कंगनाने कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

संबंधित घटना ही दुपारी साडेतीनच्या सुमारास घटना घडली. कंगनाला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते. सीआयएसएची महिला जवान कुलविंदर कौर हिने सुरक्षा तपासणीदरम्यान हे कृत्य केले.

 

 

 

यानंतर कंगनाच्या सोबत असलेल्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत कंगनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ती विमानाने दिल्लीला रवाना झाली आहे.

 

 

कंगना राणावत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरली. तिला भाजपने हिमाचलच्या मंडी येथून उमेदवारी दिली. कंगनाला उमेदवारी देताच नवा वाद निर्माण झाला होता.

 

 

 

काँग्रेसच्या एका नेत्याने कंगनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर जिथे बघावं तिथे कंगनाची चर्चा होती. कंगनाकडून या निवडणुकीत जोरदार प्रचार करण्यात आला.

 

 

 

 

अखेर या निवडणुकीत कंगनाचा विजय झाला. कंगना या निवडणुकीत 74 हजार 755 मतांनी जिंकली. कंगनाने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला.

 

 

 

कंगना हिच्यासाठी हा विजय खूप विशेष आहे. असं असताना तिला आज अचानक विमानतळावर अशा घटनेला सामोरं जावं लागल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *