शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचा शिंदे गटात प्रवेश ?

Ex-Shiv Sena minister Jaiprakash Mundada's entry into Shinde group?

 

 

 

 

 

वसमत येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिग्गज नेते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आपल्या कार्यकर्त्यांसह लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

येत्या दोन दिवसात हा पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे होणार असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. मुंदडा गेल्या काही दिवसापासून शिवसेनेत नाराज होते.

 

 

 

पक्षात त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय होत होता . २०१९ मध्ये त्यांना हिंगोली लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित करून उद्धव ठाकरेंनी त्यांना तयारी करण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे मुंदडा कामालाही लागले

 

 

 

परंतु शेवटच्याक्षणी त्यांची उमेदवारी कापून हेमंत पाटील याना देण्यात आली . त्यावेळीही मुंदडांनी पक्षनेञत्वाचा निर्णय मान्य केला , २०२४ च्या लोकसभेलाही हिंगोली मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती

 

 

 

परंतु उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळे मुंदडा यांनी शिवसेनेला रामराम करून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

 

 

 

डॉ. मुंदडा यांच्या माध्यमातून शिवसेनेचा झेंडा वसमत तालुक्यात रोवण्यात बाळासाहेब ठाकरेंना यश आले होते. चार वेळा आमदार एक वेळा राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून मुंदडांनी आपले राजकीय कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण केली .

 

 

 

सॉफ्ट निष्ठावान नेता अशी त्यांची ओळख परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर सतत होत असलेल्या अन्यायामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती शेवटी मुंदडांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

 

 

 

शिंदे गटात त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून लवकरच तो होणार असल्याची माहिती आहे. एकंदरीत मुंदडांच्या शिवसेना सोडल्यामुळे विधानसभेत पक्षाला तोटा होऊ शकतो एवढे मात्र खरे !

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *