मोदींना पाठींब्याच्या बदल्यात नितीश कुमारांनी काय मागितले ,नेत्याचा मोठा खुलासा
What did Nitish Kumar ask for in return for Modi's support, the leader's big revelation
लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मागच्या आठवड्यात NDA नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. या बैठकीत एनडीएमधील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होते.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी प्रशांत किशोर चर्चेत होते. भाजपाला 2019 इतक्याच म्हणजे 303 च्या आसपास जागा मिळतील.
भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात भाजपाला 240 जागांवर समाधान मानाव लागलं.
पूर्ण बहुमतापासून ते 32 जागा दूर राहिले. एनडीएच्या साथीने त्यांनी सरकार बनवलं. मागच्या आठवड्यात एनडीएच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडताना दिसले.
हे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये प्रशांत किशोर सुद्धा एक आहेत.
सत्तेत कायम राहण्यासाठी नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पाया पडले असा आरोप प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर केला. प्रशांत किशोर राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जातात.
जन सुराज अभियानाच्या एका सभेमध्ये बोलताना प्रशांत किशोर यांनी हा आरोप केला. शुक्रवारी 14 जून रोजी प्रशांत किशोर यांनी एकासभेला संबोधित केलं.
त्यावेळी ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी मीडियाचे लोक म्हणत होते की, नितीश कुमार यांच्या हातात भारत सरकारची कमान आहे. नितीश कुमार यांची इच्छा नसेल तर देशात सरकार बनणार नाही.
इतकी ताकद नितीश कुमार यांच्या हातात आहे” “पण त्या बदल्यात नितीश कुमार यांनी काय मागितलं?. बिहारच्या मुलांसाठी रोजगार,
बिहारमध्ये साखर कारखाने, बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा यापैकी काही मागितल नाही” अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.
बिहारचे लोक विचार करत असतील, मग त्यांनी मागितलं काय? यावर प्रशांत किशोर म्हणाले की, “नितीश कुमार यांनी बिहारच्या सर्व लोकांची इज्जत विकून सत्ता मागितली.
त्यांना 2025 नंतर मुख्यमंत्री पदावर रहायचय. त्यासाठी भाजपाकडे समर्थन मागितलय” “नितीश कुमार 13 कोटी लोकांचे नेते आहेत. आमचा अभिमान, सन्मान आहे.
ते सगळ्या देशासमोर झुकून मुख्यमंत्री बनण्यासाठी पाया पडत होते” असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. जन सुराज अभियान सुरु करण्याआधी प्रशांत किशोर जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडताना दिसले. एका वर्षापूर्वी तर त्यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली होती.
इंडिया आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि मोदींना जवळ केले. लोकसभा निवडणूक प्रचारात नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाय धरले होते.
त्यानंतरही त्यांनी अशीच कृती केली. आता राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी या सर्व प्रकारानंतर नितीश कुमार यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
“देशाने काही दिवसांपूर्वी पाहिले की, मीडिया सारखा ओरडत होता की, नितीश कुमार यांच्या हातात देशाची कमान आहे. नितीश कुमार यांनी जर ठरवले तर सध्याचे केंद्रातील सरकार आले नसते.
इतकी ताकद नितीश कुमार यांच्या हातात आहे. पण वस्तूस्थिती काय आहे? हे केवळ बिहारनेच नाही तर संपूर्ण देशाने पाहिले.”
असा खरमरीत टोला त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लगावला. जन सुराज्य अभियानातंर्गत एका सभेत त्यांनी नितीश कुमार यांना टार्गेट केले.
” NDA सरकार तयार करण्यात नितीश कुमार यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. पण त्या बदल्यात त्यांनी मागितले काय? बिहारमधील तरुणांच्या हाताला काम, रोजगार. नाही मागितला.
बिहारमधील जिल्ह्यांमध्ये साखर कारखाने सुरु करण्याची मागणी केली, नाही केली. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली का? तर नाही केली.
मग बिहारमधील जनतेच्या मनात प्रश्न पडला आहे की, नितीश कुमार यांनी मागितले तरी काय? नितीश कुमार यांनी 2025 नंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे.
त्यासाठी तर त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. पाय धरले. नितीश कुमार यांनी बिहारमधील जनतेची इज्जत विकली.” अशी तिखट टीका प्रशांत किशोर यांनी केली.
प्रशांत किशोर यांनी त्यांचा हल्लाबोल सुरुच ठेवला. ” 13 कोटी लोकांचा जो नेता आहे. पुढारी आहे. आपल्या लोकांचा अभिमान, स्वाभिमान, सम्मान आहे,
तो संपूर्ण देशासमोर केवळ मुख्यमंत्र वाचविण्यासाठी पायावर लोटांगण घेत आहे.” असे टीकास्त्र त्यांनी डागले. विशेष म्हणजे प्रशांत किशोर हे काही काळ जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पण राहिले आहेत.
प्रशांत किशोर यांचे राजकीय अंदाज गेल्या काही वर्षांपासून तंतोतंत जुळत असल्याने त्यांचे भारतीय राजकाराणात चांगले वजन आहे.