भाजप च्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा शरद पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश;म्हणाल्या “साहेब मोठी घोडचूक केली”

BJP's former union minister's entry into Sharad Pawar's Nationalism; said, "Saheb made a big mistake"

 

 

 

 

 

तब्बल दहा वर्षानंतर राष्ट्रवादीच्या माजी नेत्या सुर्यकांता पाटील यांनी पुन्हा शरद पवारांच्या नेृत्त्वाखाली राष्ट्र्वादीत घरवापसी केली आहे.

 

 

 

२०१४ साली राष्ट्रवादीची साथ सोडून सूर्यकांता यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता.आता दहावर्षानंतर पुन्हा भाजपाला सोडचिठ्ठी देत

 

 

सुर्यकांता पाटीलांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आता परतीचे दोर कापून मी राष्ट्रवादीत पुन्हा येते असे सुर्यकांता पाटील म्हणाल्या.

 

 

 

भाजपातील दहा वर्षाच्या अनुभवाबद्दल बोलताना सुर्यकांता जाधव म्हणाल्या दहा वर्ष मी वनवास भोगला अशा शब्दाच जाधवांनी मनातील खदखद व्यक्त केली.

 

 

 

सांगाल ते काम सांगाल ती जबाबदारी मी स्वीकारेन अशी ग्वाही पाटीलांनी दिली. मीच रागात साहेबांना आणि पक्षाला सोडले होते राग आणि भीक माग तोच प्रकार माझ्यासोबत घडला.

 

 

 

दहा वर्ष भाकरी भाजली, नातवडांना मोठे केले, शेती केली आता आम्हाला काम करण्याची संधी द्या अशी भावनिक साद सुर्यकांता पाटीलांनी घातली.

 

 

 

सुर्यकांता किती वयाची झाली तरी तुमच्यासाठी ती १९९९ मधील सुर्यकांता समजून माझ्यावर जबाबदारी टाका. मी फार मोठी घोडचूक केली भाजपासोबत जावून त्यावेळी तुम्ही मला म्हणाला होतात काय करणार तिथे जावून?

 

 

 

मी ऐकले नाही पण दहा वर्ष माझी वाया गेली मला काही करता आले नाही अशी नाराजी सुर्यकांता पाटीलांनी बोलून दाखवली. अनेक लोकांना पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची असे संकेत भरस्टेजवरुन सुर्यकांता पाटील यांनी बोलून दाखवली.

 

 

 

पुढे सुर्यकांता पाटील बोलताना म्हणाल्या की जयंतराव पाटील माझ्यापेक्षा लहान आहे, पण ते आता प्रदेशध्यक्ष आहे त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली, साहेबांचे वय झाले आता त्यांनी थांबावे असे वाटते

 

 

 

पण ज्या घरातील मुले माझ्यासारखी पक्ष सोडून गेली असतील तिथे बापालाच झटावे लागते असे म्हणत बंडखोरींच्या मुद्द्यावर सुद्धा सुर्यकांता यांनी भाष्य केले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *