वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे देशमुख हत्या हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! कोर्टात एकच गोंधळ
A big twist in the Deshmukh murder case due to a claim by Valmik Karad! There is chaos in the court

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात झालेल्या वादातून देखमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराड याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. वाल्मिक करपाडने कोर्टात काही दावे केले यामुळे एकच गोंधळ झाला.
संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मिक कराडनं तो मी नव्हेच असा दावा कोर्टात केला आहे. हत्ये प्रकरणात माझा सहभाग नाही.
माझ्या विरोधात पुरावे नाहीत त्यामुळे संतोष देशमुख हत्येप्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी वाल्मिक कराडनं केली आहे. मात्र, त्याच्या मागणीला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी पार पडली. आरोपींविरोधात पुरावे निश्चित झाले नाहीत. त्यामुळे आता पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
दरम्यान सुनावणीनंतर धनंजय देशमुख यांनी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली.
वाल्मिक कराडच्या दाव्यावर सरकारी वकिल उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खटल्यातून वगळण्याचा वाल्मीकचा स्टँड आश्चर्यकारक नाही.
स्वातंत्र्यवीर आणि आरोपी मध्ये फरक केला पाहिजे. वाल्मीक कराडचा स्वत:चे नाव वगळण्याच स्टँड भ्याड पद्धतीचा आहे. खटल्यातून निवृत्त करा या वाल्मीक कराडच्या अर्जावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ही टिप्पणी केली. संतोष देशमुख खून खटला हा आतापर्यंतच्या खटल्यापैकी वेगळा खटला आहे असेही उज्वल निकम म्हणाले.