नियमित अभ्यास केल्यानंतर नेट व सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकता – प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड
After regular study you will succeed in NET and SET exam in first attempt Can - Principal Dr. Pratiksha Gaikwad

गोरेगाव, मुंबई येथील चिकित्सक समूह संचलित सर सिताराम व लेडी शांताबाई पाटकर कॉलेज आणि पाटकर वर्दे
कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने
एक दिवसीय यू.जी.सी. सी.एस.आय.आर. नेट तसेच सेट चाचणी लाईफ सायन्सेस या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार्यशाळा विनामूल्य आयोजित केली होती. सदरील कार्यशाळे प्रसंगी प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार
सदरील कार्यशाळेस देशभरातून 22 महाविद्यालय तसेच विविध विद्यापीठातून एकूण 200 पेक्षा जास्त प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.
उद्घाटन प्रसंगी डॉ. के. एन. धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना संबोधले. जिद्द, चिकाटी, सातत्य तसेच वेळेचे योग्य नियोजन
केल्यास यश प्राप्त होऊ शकते असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्राचार्या प्रतिभा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही तसेच नियमित अभ्यास केल्यानंतर नेट व सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकतात असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. के. एन. धुमाळ व डॉ. सय्यद इलियास यांनी संपादित केलेले लाईफ सायन्स या विषयावरील संदर्भ ग्रंथाचे उद्घाटन करण्यात आले. सदरील पुस्तक पुणे येथील निराली प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे.
याप्रसंगी वेगवेगळे सेशन्स आयोजित केले होते. पहिल्या सेशन प्रसंगी पुना कॉलेज पुणे येथील वनस्पतीशास्त्र
विषयाचे प्राध्यापक डॉ. सय्यद इलियास यांनी
यू.जी.सी. सी.एस.आय.आर. नेट तसेच सेट चाचणी संदर्भात सविस्तर माहिती दिली. चाचणी किती मार्काची तसेच कोणकोणत्या प्रकारचे मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स विचारले जातात याची सखोल माहिती दिली.
दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. स्वप्निल शेवाळे, प्राणीशास्त्र विभाग, भवन हजारीमल सोमानी महाविद्यालय मुंबई यांनी सिस्टीम फिजिओलॉजी एनिमल्स या विषयावर वेगवेगळे ॲनिमेशन्स वापरून
अगदी सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना माहिती दिली. तिसऱ्या सत्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे माजी प्राध्यापक डॉ. के. एन. धुमाळ यांनी सिस्टीम फिजिओलॉजी प्लांट्स याविषयी सखोल माहिती दिली.
डॉ. धुमाळ यांचा 200 पुस्तक लिहिण्याचा अनुभव याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनुभवला.दुपारच्या सत्रात आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. अशोक बनकर यांनी मायक्रोबायोलॉजी या विषयावरील माहिती नमूद केली.
तसेच पाचव्या सत्रामध्ये खालसा कॉलेज येथील डॉ. प्रतीक्षा पलाहे यांनी रिकामबिनेन्ट डीएनए टेक्नॉलॉजी याविषयी सखोल माहिती दिली.
शेवटच्या सत्रामध्ये मुंबई येथील युसुफ इस्माईल कॉलेजमधील डॉ. अमित सराफ यांनी इकॉलॉजी या विषयावर सविस्तर
माहिती दिली.
या कार्यशाळेचे सर्व दिवसभराचे सूत्रसंचालन डॉ. नीलिमा प्रभू यांनी केले. सदरील कार्यशाळेस होमी भाभा स्टेट
युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई
येथील बायोकेमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. मनोहर पडुळ तसेच सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉक्टर पाटील हे उपस्थित होते. महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक सुमन पवार
तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील IQAC कॉर्डिनेटर व वनस्पतीशास्त्र
विभागातील डॉ. अनिल भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्वच स्तरावर पाटकर वर्दे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे तसेच प्राचार्या, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे
सर्वांनी कौतुक केले. असेच कार्यशाळा देशभरातील महाविद्यालयांनी आयोजित करावे असे मनोगत विद्यार्थ्यांनी
व्यक्त केले.