….. तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल ;अब्दुल सत्तारांचे मोठे विधान
..... Until then I will have a bow and arrow in my hand ;Abdul Sattar's great statement

मी विधानसभा निवडणुकीनंतर टोपी काढणार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल असं वक्तव्य शिवसेना
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. जेव्हा ते म्हणतील तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यादिवशी आमचा करार संपेल असंही सत्तार म्हणाले.
एकनाथ शिंदेंचे यांचे नऊ रत्न होते. आता एक कमी झाले आहे आता आठ राहिलो. त्यात मी देखील आहे. एक रत्न आम्ही दिल्लीत पाठवल्याचे सत्तार म्हणाले.
जेव्हा मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आले आहे.
त्यामुळं बाकीच्यांनी बोलू नये असा टोलाही सत्तारांनी नाव न घेता भाजपला लगावला. पण पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला द्यावे. मला पण पालकमंत्री होण्याची इच्छा असल्याचे सत्तार म्हणाले.
शासनाच्या मदतीशिवाय बँक चालणार नाही. त्यामुळं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला 100 कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी संचालक मंडळानं केली आहे.
शेतकऱ्यांचे 150 कोटी जे माफ केले आहेत. ते बँकेला वापरण्यासाठी द्यावे असेही सत्तार म्हणाले. अजित पवारांनी कालच विधानसभेत वीज मोफतची घोषणा केली आहे.
थकीत वीज बिलाची आकडेवारी काढली जात आहे. त्यानुसार घोषणा केली जाणार असल्याचे सत्तार म्हणाले. अल्पसंख्याक समाजाला इतिहासात पहिल्यांदा आमच्या सरकारने एवढा निधी दिला आहे.
कधी नव्हे इतके पैसे पुढील 15 दिवसांत अल्पसंख्याक विभागाला मिळणार असल्याचेही सत्तार म्हणाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला 18 कोटींचा नफा यावर्षी झाला आहे. तीस वर्षात पहिल्यांदा असे झाल्याचेही सत्तार म्हणाले.
आज हवा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. मी पैलवान आहे. कुणासोबत तरी लढायचं आहे असंही सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. निजाम सरकार असताना देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही,
तेवढा आमच्या सरकारमध्ये मिळाला असल्याचे सत्तार म्हणाले. मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला योग्य न्याय मिळेल असंही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.