मारिया मुस्तफा प्रथम पुरस्काराने सन्मानित
Maria Mustafa awarded first prize

परभणी शहरातील मोइदूल मुस्लिमीन उर्दू हायस्कूल येथे दिनियात ताहिरीरी मुकाबला (वादविवाद स्पर्धा )मध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या मारिया मुस्तफा इलाही खान हिला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याबाबत माहिती अशी कि, विध्यार्थ्यांच्या धार्मिक ज्ञानात वाढ व्हावी या उद्देशाने मोइदूल मुस्लिमीन उर्दू हायस्कूल येथे शाळकरी विद्यार्थ्यांकरिता
नोव्हेंबरमध्ये दिनियात ताहिरीरी मुकाबला (वादविवाद स्पर्धा )घेण्यात आली होती, या स्पर्धेत ३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
अतिशय उत्क्रष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे आपले विचार मांडणाऱ्या मारिया मुस्तफा इलाही खान हिला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले .
प्रथम क्रमांक पटकावल्याप्रकरणी शाळेतर्फे १ जुलै रोजी आयोजित बक्षीस वितरण समारंभात मारिया मुस्तफा हिला बक्षीस म्हणून भेट वस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गॊरविण्यात आले .
यावेळी मारिया मुस्तफा मारिया मुस्तफा या विद्यार्थिनीला गुलाम मोहम्मद मिठू सचिव मेमन मर्चंट असोसिएशन यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी मुसा नागानी ( अध्यक्ष शाळा समिती) जुनेद हमिसा (सदस्य मेंबर मर्चंट असोसिएशन )आणि इस्माईल जोया यांची प्रमुख उपस्थिती होती. मारिया मुस्तफा हिच्या या यशाबद्दल तिचे शाळेतील शिक्षक शिक्षक , नातेवाईकाकडून अभिनंदन करण्यात येत आहे