डोनाल्ड ट्रम्प वर हल्ला करणारा तरुण अवघ्या २० वर्षाचा

The young man who attacked Donald Trump is only 20 years old

 

 

 

 

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने शनिवारी पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली आहे.

 

हा अवघा २० वर्षीय तरुण असून थॉमस क्रुक्स असं त्याचं नाव असल्याचं FBI ने सांगितलं. या हल्ल्यामागचा त्याचा हेतू आता पोलीस शोधत आहेत.

 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करताच क्षणी सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्यात थॉम मॅथ्यू क्रुक्सचा मृत्यू झाला आहे.

 

शनिवारी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) एजंटने पत्रकार परिषदेत सांगितले की,

 

संशयिताकडे ओळखपत्र नसल्यामुळे शूटरच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी अधिकारी डीएनए चाचणी करण्यात येईल. “हल्लेखोराची कोणतीही ओळख नव्हती.

 

त्यामुळे त्याची डीएनए चाचणी करण्यात येईल”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, त्याची ओळख पटवण्यात आली. उदाहरणार्थ,

 

आम्ही आत्ता छायाचित्रे पाहत आहोत आणि आम्ही त्याचा डीएनए चालवण्याचा आणि बायोमेट्रिक पुष्टीकरण मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत.”

 

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, बटलर फार्म शो मैदानावरील स्टेजपासून १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या छतावर क्रूक्स लपून बसला होता.

 

या मैदानाच्या दक्षिणेस ५० किमीवर बेथेल पार्क हे गाव आहे. क्रुक्सकडून नंतर एआर शैलीतील रायफल जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे.

 

 

हल्ल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी पहाटे न्यू जर्सी येथे गेले. विमानातून उतरतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली याप्रकरणाची चौकशी होणार आहे. या हल्ल्यातील हल्लेखोर मारला गेल्याने याप्रकरणाचा तपास लागण्याकरता कदाचित काही महिने किंवा वर्ष लागू शकतील, असंही म्हटलं जातंय.

 

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, प्रचारसभेत गोळीबाराचा चारवेळा आवाज आल्याचं एका समर्थकाने सांगितलं. त्यामुळे गोळीबाराचा आवाज येताच सगळेजण खाली वाकले.

 

“मी सुमारे चार शॉट्स ऐकले आणि मी बघितले की जमाव खाली वाकला आणि नंतर ट्रम्प देखील लगेच खाली वाकले. मग सीक्रेट सर्व्हिसने शक्य तितक्या लवकर त्यांचे संरक्षण केले.

 

एका सेकंदात हे सर्व घडलं”, असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. एक व्यक्ती पळून जात असताना लष्करी गणवेशातील अधिकारी

 

त्याचा पाठलाग करत होता. त्यावेळीही गोळ्यांचा आवाजा ऐकू आला. परंतु त्यांना कोणी गोळ्या घातल्या हे अस्पष्ट आहे, असेही प्रत्यक्षदर्शी म्हणाला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *