शरद पवारांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर जयंत पाटलांनी दगडफेकीतील आरोपीचे नवीन फोटो आणले समोर
On Sharad Pawar's 'that' viral photo, Jayant Patal brought new photos of the stone pelting accused
अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेकीतील आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत.
भाजप नेते नितेश राणे यांनी एक्सवर अंतरवाली सराटीतील मुख्य आरोपी ऋषीकेश बेंद्रे याचा शरद पवार आणि राजेश टोपेंसोबतचा फोटो पोस्ट करत गंभीर आरोप केले होते. यावर राजेश टोपे यांनी आपण बेंद्रेला ओळखत नसल्याचे एक्सवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले होते.
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असा प्रश्न विचारत नितेश राणे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुसऱ्या नेत्यांसोबतचे बदरे याचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत.यात आरोपी ऋषीकेश बदरे याचा नितेश राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसून येत आहे.
तसेच यावरुन जयंत पाटील यांनी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, हा बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे असे म्हटले आहे.
सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत.
म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले असे म्हणायचे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान जयंत पाटील यांनी त्या आरोपीचे इतर नेत्यांसोबत असलेले फोटो या ट्विटमध्ये जोडले आहेत.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
आदरणीय पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत.
सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, ही बाब महाराष्ट्रातील… pic.twitter.com/qVpT0GalRB
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 26, 2023