भुजबळ शरद पवारांच्या भेटीवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

What did Supriya Sule say about Bhujbal Sharad Pawar's visit?

 

 

 

मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

 

 

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला,

 

असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. छगन भुजबळ यांच्या या भेटीवर आज सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली.

 

 

“छगन भुजबळ साहेबांना भेटायला गेले, याबद्दल माहित नाही. हे तुमच्याकडून मी ऐकतेय. मी पुण्यात आहे. माझ्या माहितीप्रमाणे, साहेब आज यशवंतराव चव्हाण सेंटरला जाणार नव्हते.

 

 

भुजबळ सिलवर ओकला गेलेत, या बद्दल खरच काही मला माहित नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनील तटकरेंनी काल

 

अजितदादांची तुलना वसंत दादांबरोबर केली, त्यावर ‘ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे’ असं सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं.

 

“आम्ही राजकारण जर तर वर करत नाही. आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आम्ही व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. जनतेच्या आयुष्यात चांगले बदल करण्यासाठी राजकारण करतो.

 

 

व्यक्ती केंद्रीत राजकारण करत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘राष्ट्रवादीत कोण येणार? हा संघटनात्मक निर्णय असेल’ असं त्या म्हणाल्या.

 

“कात्रजच्या चौकात अनेक अतिक्रमण आहेत. कुणाचाही अतिक्रमण असेल सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल, तर ते अतिक्रमण काढायला पाहिजे,

 

 

अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. सर्वसामान्य पुणेकर ट्रॅफीकमध्ये भरडला जातोय” असं पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

 

त्यानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी

 

आपली भूमिका मांडली. मेळाव्यात काल असलेल्या रिकाम्या खुर्च्या पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असणार? यामुळे ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

 

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, काल मेळाव्यात रिकाम्या खुर्च्या होत्या. त्या खुर्च्या बघून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील.

 

त्यामुळे ते गेली असतील. तसेच शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकाही केली होती. त्यानंतर त्यांचे मत काय? हे सांगण्यास शरद पवार यांच्याकडे गेले.

 

या सर्व प्रकारानंतर शरद पवार यांनी मोठ्या मनाने त्यांचे दरवाजे उघडले. हिच महाराष्ट्राची संस्कृती आहे. वैयक्तीक द्वेष करुन खोट्या केसेसमध्ये अडकवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

 

 

छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन केला. आरक्षणासंदर्भातील हा विषय आहे. परंतु गेली दोन वर्ष चर्चे भुजबळ यांनी चर्चेला बोलवले नाही. न मराठ्यांच्या चर्चेत बोलवले ना ओबीसींच्या चर्चेत बोलवले.

 

 

पण आज बोलवत आहे. आम्हालाही स्वत:चे वैयक्तीक काही आहे की नाही? आता शरद पवार यांची भेट कशासाठी आहे, हे मला माहीत नाही आणि ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

 

छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सोमवारी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे राज्यातील राजकारणात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवार हे महायुतीसोबत गेले. गेल्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता.

 

 

त्यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे अनेक महत्वाचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र आता वर्षभरानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी असून शरद पवार यांनी अद्याप त्यांच्या भेट घेतलेली नाही.

 

मात्र भुजबळांच्या या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सगळ्यांचेच या भेटीकडे लक्ष लागले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भुजबळ-पवार यांच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीच भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्याच्या निवासस्थानाच्या दिशेने निघाले. मात्र शरद पवार यांची वेळ न घेताच छगन भुजबळ त्यांना भेटायला पोहचले.

 

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आज केवळ मिलिंद नार्वेकर यांना पवारांच्या भेटीसाठी वेळ देण्यात आली होती. मात्र सकाळी भुजबळ अचानक सिल्व्हर ओक मध्ये आल्याने

 

 

 

राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. पण अद्यापही शरद पवार यांनी भुजबळ यांची भेट घेतली नसून तासाभरापासून भुजबळ हे वेटिंगवरच आहेत.

 

 

छगन भुजबळ हे वेळ न घेता पवार यांच्या भेटीला आले आहेत. तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे वेळ घेऊन पवार यांच्या भेटीला आले होते. त्यामुळे पवार यांनी नार्वेकर यांना आधी भेट दिली.

 

 

त्यामुळे भुजबळ यांना तिष्ठत राहावं लागल्याचं सांगितलं जात आहे. भुजबळ यांना पहिल्यांदाच पवारांची भेट घेण्यासाठी ताटकळत राहावं लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज भुजबळांनी थेट पवारांचे निवाससथान गाठल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

 

 

भुजबळ अचानक पवारांच्या भेटीसाठी का आले याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे, मात्र त्यामुळे अनेकांची उत्सुकता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

 

कालच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मात्र त्यानंतर आज सकाळी भुजबळ अचानक सिल्वहर ओकवर पवारांच्या भेटीसाठी पोहोचले.

 

 

‘ राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

 

 

शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला’, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *