उपमख्यमंत्री अजित दादांकडून सुप्रिया सुळेंचं कौतुक

Appreciation of Supriya Sule by Deputy Chief Minister Ajit Dada

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेचे उदघाटन झालं. पुणे जिल्हा परिषद इमारतीत नवीन शाखेचं हे उद्घाटन पार पडलं.

 

 

डीपीडीसी बँकेच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

 

 

यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांचं कौतुक केलं आहे. सुप्रिया सुळेंनी चांगली सूचना केली आहे. लोकसभा सेशनच्या आधी मुख्यमंत्री खादारांची बैठक घेतात

 

आणि राज्यातील प्रश्न सांगतात. नंतर खासदार ते प्रश्न संसदेत मांडतात. खासदार पण आपल्याला मदत करतात. मुख्यमंत्र्यांनी कॉल घेतला नाही, कॉल झाला कि त्यांना देखील कळणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

DPDC च्या बैठकीतील मुद्द्यांवर अजित पवारांनी भाष्य केलं. DPDC चा जो प्रोटोकॉल आहे तो पाळायला नको का? स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना कामे मांडण्याचा अधिकार आहे.

 

 

दोन तास मिटिंग त्यांनीच चालवली मी फक्त उत्तरे देत होतो. यापूर्वी जिल्हापरिषद माझ्याच विचारांची होती. याआधी असं कोणी विचारलं नव्हतं. मी प्रोटोकॉलचा जीआर आणि गॅजेट घेऊनच आलो होतो, असं अजित पवारांनी सांगितलं.

 

यंदाच्या वर्षी शहराजवळच्या मोठ्या गावांचा विचार केला. कचरा विल्लेवाट लावण्यासाठी मोठा निधी दिला गेला. सध्या गावात ड्रॉन फिरतायत, ते ड्रॉन पाडण्यासाठी बंदुका लागतात त्यासाठी देखील पोलिसांना निधी दिलाय.

 

गड किल्ले संवर्धन करणार मूलभूत व पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी दिला जाणार आहे. काही भागातील अंगणवाड्या खराब त्याच देखील बांधकाम करणार आहोत.

 

क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी मागणी काहींनी केली लाखापेक्षा जास्त वर्दळ असेल तर दिला जाईल अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंगू आणि झिका वाढू नये म्हणून काळजी घेतली जातीये, असं अजित पवार म्हणाले.

 

 

पूजा खेडकर प्रकरणावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. हा अधिकार केंद्राचा आणि आयोगाचा आहे. पूजा खेडेकरांना पोलिसांनी बोलावलं

 

पण त्या अजून पोलिसांपर्यंत आल्या नाहीत. मी पोलिसानं मेल, मॅसेज करायला सांगितलं. चौकशी करून कायद्याच्या चौकटीत बसेल ते होईल, असं अजित पवारांनी म्हटलंय.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *