अमित शाह शरद पवारांना म्हणाले भ्रष्टाचाराचे सरदार

Amit Shah called Sharad Pawar the leader of corruption

 

 

 

“भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात.

 

आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं.

 

यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात घेतली होती. दरम्यान,

 

अमित शाहांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांनी आरोप केलेले डर्टी डझन नेते आज त्यांच्यासोबत सत्तेत बसले आहेत, असं सुळे म्हणाल्या आहेत.

 

अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाले, शरद पवार साहेबांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. अमित शाहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की

 

त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने पवार साहेबांना सन्मानित केलेलं आहे. डर्टी डझन ही सिरीज भाजपने सुरू केली. त्यातील डर्टी डझन असणारे नेते आज अमित शाहांच्या भाजपचे राज्याचे मंत्री आहेत

 

 

किंवा पदाधिकारी आहेत. आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर आजच्या मंचावर शाहांच्या मागे बसलेले दिसले.

 

त्यांच्यावर याच भाजपने किती तरी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी तर चक्की पिसिंग ही लाईन धरली होती. हे तुम्हीच तपासा, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

 

 

भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? अमित शाह म्हणाले, जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत.

 

आमच्या 240 जागा आल्यात, यांचे सर्वाच्या मिळून पण आल्या नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय.

 

आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.

 

 

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली. याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले.

 

 

60 वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. विधानसभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे. काल रात्री देखील मला कार्यकर्ते भेटले.

 

 

संभ्रम निर्माण करण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. राम जनमभूमीसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केलाय. कुणीही इतकी वर्ष तिथे पाहिले नाही.

 

 

आम्ही मंदिर बनवून दाखवलं. उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरी कायदा आणला आता संपूर्ण देश वाट बघतोय. आम्ही आतकवाद संपवून टाकला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *