राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया

State Agriculture Minister Dhananjay Munde underwent surgery

 

 

 

राज्याचे कृषीमंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या तब्येबतीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून

 

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. आणखी 4-5 दिवस रुग्णालयातच विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

 

दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार पंकजा मुंडे यांच्याकडून तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे.

 

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात करण्यात आली आहे.

 

त्यांना अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आता पोटदुखीचा त्रास वाढल्याने शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

 

मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

बुधवारी (ता.24) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी (ता.26) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

तसेच भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतमा मुंडे यांनी देखील रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे गिरगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया रविवारी पार पडली आहे.

 

सध्या धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 

मागील काही दिवसांपासून पित्ताशयाचा त्रास त्यांना होत असल्याने मुंबईतील गिरगावातील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये त्यांना हलवण्यात आले होते.

 

मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून रविवारी पित्ताशयाची पिशवी काढण्यात आली. दरम्यान, मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *