MPSC मध्ये बनावट प्रमाणपत्रे?, संघटनेकडून २५० जणांची यादी आयोगाकडे

Fake certificates in MPSC?, list of 250 from organization to commission

 

 

 

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन राज्यभरात नव्हे देशभरात वादळ निर्माण झाले आहे. पण संघ लोकसेवा आयोगातील (यूपीएससी) या प्रकारानंतर देशभरात

 

काही अधिकाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्रे दिल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावरुन अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहे.

 

त्याचवेळी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला जात आहे. स्टुडेंट राईट असोसिएशन या संघटनेने यादीच तयार केली आहे. ती यादी लोकसेवा आयोग, दिव्यांग मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

 

राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते. त्यासाठी दिव्यांगासाठी आरक्षण कोटा दिलेला असतो.

 

परंतु या कोट्याचा गैरवापर होत असतो. काही जण निकषानुसार दिव्यांग नसताना त्यांच्याकडून त्या आरक्षण कोट्यातून अर्ज केले गेले आहेत.

 

राज्यात २५० विद्यार्थ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा दावा करण्यात येत आहे. एमपीएसससी स्टुडेंट राईट असोसिएशनकडून हा दावा केला गेला आहे. त्यासंदर्भातील यादी एमपीएससी आयोग आणि दिव्यंग मंत्रालयाला देण्यात येणार आहे.

 

एमपीएसससी स्टुडेंट राईट असोसिएशनचे महेश बडे यांनी सांगितले की, राज्यात सर्व्हे करुन यादी तयार केली आहे. त्या सर्व्हेमध्ये काही जणांनी बनावट प्रमाणपत्रे घेतल्याचे समोर आले आहे.

 

यामुळे आता ही यादी आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देणार आहे. तसेच एमपीएससीने या प्रकरणाची फेर पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे.

 

पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीमधील दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचा विषय समोर आला. त्यानंतर राज्यातही असाच प्रकार होत असल्याचा दावा स्टुडंट राईट असोशिएशनने केला आहे.

 

यामुळे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सर्व प्रकरणाची चौकशी करणार का? संघटनेने ज्या २५० जणांची नावे दिली आहे, त्याची चौकशी होणार का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *