पृथ्वीराज चव्हाणांच्या त्या वक्तवव्यावर विखे पाटलांचा पलटवार

Vikhe-Patal's counter attack on Prithviraj Chavan's statement

 

 

 

काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानानं आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले.

 

 

 

त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे.

 

 

“मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावं लागलं. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली.

 

 

 

२०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं. सरकार पडलं नसतं आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवली असती. तसेच, २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आले असतं. भाजपाचं सरकार आलेच नसते,” असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं.

 

 

 

“मराठा आरक्षणाचा प्रश्नही मी सोडावला असता. कारण, ५० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी मी निर्णय घेतला होता. सरकार राहिलं नसल्यानं मराठा आरक्षणही न्यायालयात टिकलं नाही. अन्यथा मराठा आरक्षण टिकवलं असतं,” असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

 

 

 

 

पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर विखे-पाटील म्हणाले, “सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही.”

 

 

 

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर खासदार सुनील तटकरेंनी भाष्य केलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा समज होता.

 

 

 

पण, हल्ली त्यांना विनोद का सुचतो आहे, ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असं म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

 

 

 

“पृथ्वीराज चव्हाणांना सुपारी देऊनच पाठवलं होतं. जर, आम्ही निवडणुका एकत्र लढवणार नव्हतो, तर सरकारमध्ये राहण्यात अर्थ नव्हता. चव्हाणांच्या काळातच आघाडीची लय बिघडली.

 

 

 

आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली,” अशी टीकाही सुनील तटकरेंनी केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *