थेट भाजप आमदारांचे नाव लिहून केली आत्महत्या ;मराठवाड्यातील घटना
Suicide by directly writing the names of BJP MLAs; Incident in Marathwada
जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जयदत्त सुरभेये नावाच्या तरुणाने आत्महत्या केली असून त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये
भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचे नाव आहे. कुचे यांच्या धमक्यांमुळेच आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव जयदत्त सुरभेये असे आहे. या तरुणाने आमदार नारायण कुचे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपक जातोय.
आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदार नारायण कुचेंच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याच उल्लेख करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त या तरुणाने कुचे यांच्या जय भवानी बँकेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुसाईड नोटमध्ये नारायण कुचे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाला मी आयुष्यात कधीही बोललेलो नाही. मी त्याला आयुष्यात कधीही बोललेलो नाही. मी त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नाही.
आमचा फोनद्वारेही संपर्क झालेला नाही. मृत तरुणाचा आणि माझा व्यवहाराचा कधीही संबंध आलेला नाही. मृत तरुण माझा नातेवाईकच आहे.
मृत तरुणाची बहीण माझी सून आहे. मृत तरुणाचा मेहुणा माझ्या पतसंस्थेत नोकरीला आहे. त्यांचं नाव मोतीलाल कुचे आहे. त्यामुळे मृत व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक आहे, असे नारायण कुचे यांनी स्पष्ट केले.
सध्या चर्चेत असलेली चिठ्ठी ही दुसऱ्याच व्यक्तीने पोलिसांना दाखवलेली आहे. म्हणून राजकीय द्वेषापोटी मला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा मला संशय आला आहे. त्यामुळेच मी स्वत: सीपी साहेबांना या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे.
मी फोनद्वारे धमकी दिली, असा आरोप केला जात आहे. मी धमकी देणारा माणूस नाही. मृत तरुणावर लाख ते दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाचे हफ्ते क्लियर आहेत.
मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना भेटलो आहे. मला बदनाम
करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही चिठ्ठी मृत तरुणानेच लिहिलेली आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी नारायण कुचे यांनी केली.