अब्दुल सत्तार बनले फडणवीसांचे दूत मनोज जरांगे सोबत पहाटे अडीच वाजेपर्यंत चर्चा

Abdul Sattar became Fadnavis's envoy Manoj Jarange discussed till 2:30 in the morning

 

 

 

मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल 3 तास चर्चा झाली आहे. चर्चे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली आहे.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

 

मंत्री अब्दुल सत्तार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये पहाटे अडीच वाजेपर्यंत तीन तास चर्चा झाली. शेतकऱ्यांच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी,

 

यासह मराठा आरक्षणासच्या मागणीपबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. याशिवाय चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरती चर्चा झाल्याचा मनोज जरांगे यांनी सांगितलं.

 

दरम्यान सरकारकडे आता केवळ 60 दिवस उरले आहेत. मनोज जरांगे यांनी केलेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या आणि आरक्षणाच्या

 

मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बातचीत करणार आहे. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

 

तसेच अतिवृष्टीमुळं अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहे.

 

त्यामुळं नकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांनी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

 

दरम्यान, आज मुंबईत मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा होणार असल्याची माहिती सत्तार  यांनी दिली आहे.

 

त्यामुळं यावर आज काय तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात मात्र, विविध चर्चा रंगू लागल्याचं देखील पाहा.ला मिळालं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *