फडणवीसांचा बालेकिल्लाही ढासळणार ? चिंता वाढवणारा सर्व्हे

Will the fortress of Fadnavis collapse? An anxiety-inducing survey

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी सत्ताधारी महायुतीला मोठा दणका दिला. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

 

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेनेंनी केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील जनतेचा मूड समोर आला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विरोधकांची महाविकास आघाडी घोडदौड करेल,

 

असा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अर्थात एमएमआरमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी राहिली असेल, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५ हा जादुई आकडा आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मिळून विधानसभेच्या १७० जागा येतात.

 

या तिन्ही विभागांत महाविकास आघाडीची कामगिरी सरस राहणार असल्याचा अंदाज आहे. १६ ते २५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून महायुतीला १२३,

 

तर मविआला १५२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना या सर्वेक्षणानंतर घडली. त्यामुळे ती घटना, त्याचे पडसाद, परिणाम यांचा समावेश सर्वेक्षणात नाही.

 

सेफॉलॉजिस्ट दयानंद नेनेंच्या सर्वेक्षणातून विदर्भात महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०१४ मध्ये भाजपनं विधानसभा स्वबळावर लढवली.

 

विदर्भातील ६२ पैकी ४४ जागांवर विजय मिळवत भाजपनं दणदणीत कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर भाजपनं राज्यात सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या.

 

२०१९ मध्ये भाजपच्या विदर्भातील जागा २९ वर आल्या. आता येत्या विधानसभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या बालेकिल्ल्यात पक्षाला आणखी धक्के बसण्याचा अंदाज आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात जोरदार धक्का बसला. भाजपला केवळ २ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत पक्षाला ५ जागा मिळाल्या होत्या. विदर्भात लोकसभेच्या १० जागा आहेत.

 

नेनेंनी केलेल्या सर्व्हेनुसार, येत्या निवडणुकीत महायुतीला विदर्भातील ६२ पैकी केवळ १८ जागांवर यश मिळू शकतं. विशेष म्हणजे फडणवीसांच्या नागपुरात मविआला ८,

 

तर महायुतीला ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावतीमध्ये महायुतीला खातंही उघडता येणार नाही, असं सर्व्हे सांगतो.

 

विदर्भ- ६२
मविआ ४२, महायुती १८, अन्य- २

 

 

चंद्रपूर-६
मविआ ५, महायुती १

 

 

गडचिरोली- ३
मविआ ३, महायुती ०

 

 

गोंदिया- ४
मविआ ४, महायुती ०

 

 

भंडारा- ३
मविआ ३, महायुती ०

 

 

नागपूर- १२
मविआ ८, महायुती ४

 

 

वर्धा- ४
मविआ २, महायुती २

 

 

अमरावती- ८
मविआ ६, महायुती ०, अन्य २

 

वाशिम- ३
मविआ २, महायुती १

 

 

अकोला- ५
मविआ ४, महायुती १

 

बुलढाणा- ७
मविआ ३, महायुती ४

 

 

यवतमाळ-७
मविआ २, महायुती ५

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *