मला मुख्यमंत्री करा तुमच्या बाजूने निकाल देतो; झिरवाळ यांचा गौप्य्स्फोट
Make me CM gives the verdict in your favor; Jhirwal's secret blast
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावनी वेळी मी जयंत पाटलांना सांगीतले होते.
आता या सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेला असेल आणि तुम्हाला हवा तसा निर्णय देईल.
पण मला मुख्यमंत्री करा अशी ऑफर मी त्यांना दिली होती’ असा बोलण्याच्या ओघात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.
जयंत पाटील माझा नेता असून जंयत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळ झिरवाळलाही मीच पाठवले होते, असा दावाही झिरवाळ यांनी केला आहे.
राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या फुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असतांना, झिरवाळ यांनी धक्कादायक खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना झिरवाळ यांनी गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीचा संदर्भ देतांना मुख्यमंत्रीपदाचा खुलासा केला आहे.
झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ आणि जंयत पाटील यांच्या भेटीवर बोलतांना जयंत पाटील माझा नेता असून त्यांचा जाऊन सत्कार कर आशा सूचना मी गोकुळला दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
तुझ्यात बापासारखे गुण आहेत , असे जयंत पाटील यांनी त्याला सांगीतले. त्यामुळे त्यानेही निवडणूक लढविण्याचे सांगीतल्याने
हा संभ्रम तयार झाल्याचा दावाही झिरवाळ यांनी केला आहे. आता तो जागेवर असून कायमस्वरुपी जागेवरच राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
याआधीही लोकसभा निवडणूकीवेळी पेठ दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहीत पवारांचे स्वागत करायला मीच पाठवले आहे.
कोणीही आले तरी,त्याचे स्वागत,सत्कार करण्याची आपली संस्कृती आहे याचा दाखला देतांना,त्यांनी जंयत पाटील आणि त्यांच्यात सरकार पडतांना झालेल्या चर्चेवेळचा दाखला दिला.
परंतु, पाटील आणि माझ्या चर्चेत काही नवल नाही. मी फक्त माझ मत मांडलं.त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांसाठी अट्टाहास करत होतो असे नाही
अशी सारवासारव देखील झिरवाळ यांनी केली आहे.मी शंभर टकके अजित दादा बरोबर असून जीथे दादा जातील तिथे जाईल अशी सारवासारवही त्यांनी केली आहे.
दिडोंरीतून माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यावरही झिरवाळ यांनी भाष्य केले आहे.
महायुती मधील प्रतिस्पर्धी असणाऱ्या माजी आमदार धनराज महाले यांची भेट घेणार असून निवडून येण्यासाठी उभे राहणार असाल तर ठीक मात्र अपक्ष लढून मला अडचणीत आणण्यासाठी
निवडणूक लढविणार असाल तर निवडणूक लढवू नका अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले.