एखाद्या आमदाराचा निगेटिव्ह सर्व्हे आला तर काय ?महायुतीने घेतला मोठा निर्णय

What if a MLA gets a negative survey? Mahayuti has taken a big decision

 

 

 

 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काहीच दिवसात लागण्याची शक्यता असताना आता राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आल्याचं दिसतंय.

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अशीच एक बैठक पार पडली. महायुतीमध्ये एखाद्या आमदाराचा निगेटिव्ह सर्व्हे आला तर त्या जागेवर त्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याची माहिती

 

यावेळी अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना दिली. तसेच स्थानिक पातळीवर महायुतीचे नेते-कार्यकर्त्यांशी जुळवून घेण्याचा सल्लाही अजित पवारांनी दिल्याची माहिती आहे.

 

 

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीची 24 आणि 25 तारखेला दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत महायुतीत वाद असणाऱ्या जागांवर चर्चा होणार आहे.

 

या दोन दिवसीय बैठकीत तोडगा न निघणाऱ्या जागांबाबत दिल्लीत अमित शाह यांच्यासमवेत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

 

 

महायुतीमध्ये एखाद्या आमदाराचा सर्व्हे निगेटिव्ह आल्यास त्या जागेवर त्याच पक्षाचा दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार असण्यावर एकमत झाल्याचं अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीत सांगितलं.

 

विधानसभा मतदारसंघातील वाद स्थानिक पातळीवर सोडवण्यावर भर द्यावा याकडेही अजित पवारांनी आमदारांचे लक्ष वेधलं.

 

अजित पवार यांची राष्ट्रवादी जवळपास 70 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या आधी अजित पवारांच्या पक्षाने 80 जागांची तयारी सुरू केली होती.

 

पण आता 70 च्या आसपास जागांवर दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने गेल्या निवडणुकीत 54 आमदार निवडून आणले होते. त्यामध्ये आता 15 जागा जास्त मागण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.

 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते आणि आमदारांना बोलवण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

अमित शाह यांनी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत जुळवून घ्या अशा सूचना दिल्यानंतर अजित पवार आपल्या आमदारांना आपल्याला घटक पक्षांसोबत जुळवून घ्यायचं आहे

 

या संदर्भात सूचना केलया. तसेच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस जिथे संघर्ष आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं केलं पाहिजे याबाबत सूचना देण्यात आल्या.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महामंडळ वाटपावरून नाराजी आहे. अनेक पदाधिकारी नाराज आहेत त्यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. नियोजन विभागाच्या माध्यमातून

 

कामांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या मात्र अद्याप जुलै महिन्यापासून आमदारांना निधी देण्यात आलेला नाही. याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *