पूणे – करीमनगर साप्ताहिक विशेष गाडीच्या ८ फे-या

8 rounds of Pune - Karimnagar weekly special train

 

 

पूर्णा-शेख तौफिक

 

आगामी काळातील सण उत्सव यामुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी

 

पूणे-करीमनगर-पूणे या साप्ताहिक विशेष गाडीच्या ८ फे-या मंजूर केल्या आहेत.ही गाडी आॅक्टोंबर व नोव्हेंबर
औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड,

 

भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद मार्गे पुणे-करीमनगर– पुणे अशी धावणार आहे.पुणे, मुंबई,नाशिक आदी महानगरातील विद्यार्थी ,चाकरमान्यांची दसरा आणि दिवाळी सणाला

 

घरी जाण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षित सेवेला मोठ्या प्रमाणात पसंती देतात. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी तसेच प्रवाशांचे हित जोपासण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे ने

 

पुणे- करीमनगर-पुणे या विशेष गाडीच्या 08 फेऱ्या मंजूर केल्या आहेत,पूणे ते करीमनगर ही साप्ताहिक विशेष दिनांक २१ आणि २८ ऑक्टोबर रोजी व ०४ आणि ११ नोव्हेंबर,

 

रोजी दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री २२;४५ वाजता सुटेल आणि दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, अंकाई, रोटेगाव, औरंगाबाद,

 

जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्तरकुंड, बोधडी, किनवट, आदिलाबाद, माजरी, चंद्रपूर, बलारशा,

 

सिरपुरकागजनगर, मंचिर्याल, रामागुंडम, पेडपल्ली मार्गे करीमनगर येथे बुधवारी सकाळी २ वाजता पोहोचेल. ही गाडी ऑक्टोबर आणि

 

नोव्हेंबर, महिन्यात मिळून 04 फेऱ्या पूर्ण करेल. तर करीमनगर-पुणे साप्ताहिक विशेष दि.२३ आणि ३० ऑक्टोबर रोजी व ०६ आणि १३ नोव्हेंबर,

 

रोजी दर बुधवारी करीमनगर रेल्वे स्थानकावरून सकाळी ६ वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पुणे येथे गुरुवारी सकाळी ९:४५ वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल मिळून १८ डब्बे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *