पूर्णेत पोलीसांच्या धाडीत वाळुसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4 lakh worth of valuables, including sand, were seized in a police raid in Purne
पूर्णा-शेख तौफिक/9970443024
शहर व परिसरातील पूर्णा व थुना नदीच्या काठावरील हिंदू स्मशानभूमी परिसरात चोरी होत असलेल्या वाळू ठिकाणांवर छापेमारीकरत वाळूने भरलेले एक टिप्पर जप्त केल्याची कार्यवाई
रात्रगस्तीवर असलेल्या पोलीसानी जवानांनी शुक्रवार २७ रोजी पहाटेच्या वेळी केली आहे. घटनास्थळावर पोलीसांना पाहताच टिप्पर मालकाने वाहन जागीच सोडून पळ काढला .
मात्र पोलीसांनी वाळुने भरलेला टिप्पर असा ४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीसांनी टिप्पर चालक मालकांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पूर्णा पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या शहर बीट मध्ये संदिप चौरे, पो.शि. अक्कलवाड हे दोघे बिट मार्शलींग करण्यासाठी बुधवारी मध्यरात्री रात्र गस्तीवर होते
संदीप चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांना हिंदू स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूस एका टिप्पर मध्ये बेकायदेशीर रित्या वाळू भरल्याजात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यांनी तातडीने रात्र गस्तीवर असलेल्या पो.उप. निरीक्षक लोखंडे व पो.शि.कुंभारगावे यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले. पहाटे ३ वाजेच्या दरम्यान
पोलीस जवान येत असल्याचे पाहून वाळू चोरणारे टिप्पर चालक,मालक, टिप्पर सोडून घटनास्थळांवरून पसार झाले. पोलीस जवानांनी जुन्या वापरातील ४ लाख रुपये किंमतीचा वाळुने खचाखच भरलेला टिप्पर
ताब्यात घेऊन पूर्णा पोलीस ठाण्यात मुद्देमाल जमा करत पो.काॅ.संदिप चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाच्या विरोधात
भारतीय न्याय संहिता कलम गौण खनिज अधिनियम अनुसार गुन्हा दाखल केला आहे.तपास जमादार श्याम काळे हे करत आहेत.