अमित शहा म्हणाले पुढचा CM भाजपचाच,त्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?

Amit Shah said the next CM belongs to BJP, what did Chief Minister Shinde say on that?

 

 

 

विधानसभेनंतर महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी २०२९ मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत असेल, असं विधान केलं.

 

त्यामुळे भाजप शतप्रतिशत सत्ता आणण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या

 

अमित शहांनी पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असं पक्ष पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगितलं. खासगी वृत्तवाहिनीने याबद्दलचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध केलं आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनीती आखण्यासाठी मुंबईत आलेल्या अमित शहांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

 

राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल आणि मुख्यमंत्री भाजपचाच असेल. भाजपला रोखण्याची क्षमता कोणातच नाही, असं शहा

 

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत म्हणाले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

 

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास अमित शहांनी बोलून दाखवला. विधानसभा निवडणूक जिंकल्यावर राज्यात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

राज्यातील समस्या सोडवण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्याचं म्हणत शहांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबद्दल विश्वास व्यक्त केला.

 

महायुती सरकारचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असं शहांनी स्पष्टपणे पदाधिकाऱ्यांना सांगितलं. ‘विधानसभा निवडणुकीत स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याचा सल्ला शहांनी दिला.

 

पक्षाचा व्होट शेअर १० टक्क्यांनी वाढल्यास आपण २० ते ३० जागा अधिक जिंकू शकतो, याकडे शहांनी लक्ष वेधलं. अन्य पक्षातील नेते

 

जरी भाजपमध्ये आले तरी, भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान आणि आदर दिला जाईल, अशी हमी शहांनी दिली’, असं सुत्रांनी सांगितलं.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधील स्वामिनारायण मंदिरातील योगी सभागृहात शहांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. २०२९ मध्ये राज्यात स्वबळावर सरकार आणू,

 

असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात २०२४ला महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं शहा म्हणाले.

 

२०२९मध्ये केवळ भाजपच्याच जिवावर महाराष्ट्रात सरकार आणू. त्या वेळी एकट्या कमळाचं सरकार असेल, असं विश्वास शहांनी बोलून दाखवला.

 

 

२०२९ मध्ये केवळ भाजपच्याच जिवावर महाराष्ट्रात सरकार आणू, त्या वेळी एकट्या कमळाचे सरकार असेल, अशी गर्जना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी केली.

 

त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्ये महायुतीचं सरकार येईल, २०२९ ला अजून वेळ आहे, अशा शब्दात उत्तर देत शिंदेंनी विषय वाढवणं टाळलं.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधील स्वामीनारायण मंदिर येथील योगी सभागृहात अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

लोकसभेत दोन जागा आल्या तेव्हा कुणी पक्ष सोडून गेलं नव्हतं. आताही राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे.

 

 

६० वर्षात महाराष्ट्रात सलग तीन वेळा एकही पक्ष निवडणूक जिंकलेला नाही. आपण महान भारताच्या रचनेसाठी राजकारणात आलोय, असं अमित शाह म्हणाले.

 

शाहांच्या दाव्यानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस

 

या पक्षांचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

२०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुती सरकार येईल, २०२९ ला अजून वेळ आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर महाराष्ट्रात कुणा

 

एका पक्षाचं सरकार येऊच शकत नाही, अमित शाह यांचं वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांचं मोराल वाढवण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

 

महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. आपल्या नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करा.

 

प्रत्येक निवडणूक बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते हवेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरतील.

 

या कार्यकर्त्यांनी आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवायचे आहे. प्रत्येक बूथवर किमान २० जणांना भाजपचे सदस्य करा.

 

सदस्य करताना मतं मागू नका. सदस्य झाल्यावर त्यांना आपसूकच मतदानाचं महत्त्व कळेल, अशा शब्दात अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *