रात्री उशिरा अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे सोबत चर्चा

Amit Shah's discussion with Chief Minister Shinde late at night

 

 

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा फटका बसल्यानंतर भाजप आणि महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. काल, मंगळवारी (दि. 1 ऑक्टोबर) रात्री उशिरा सह्याद्री अतिथी गृहामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये रणनीतीवर खलबकतं झाली. या बैठकीत राज्यात महायुतीचंच सरकार आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्याशिवाय,

 

त्यांनी भाजप नेत्यांच्याही बैठका घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याला चांगलेच महत्त्व आले आहे.

 

मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली.

 

या बैठकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर होता कामा नये अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे

 

यांनी अमित शाह यांना केली. विधानसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप लवकरच जाहीर करायला हवं अशी मागणीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

 

 

एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेसाठी अपेक्षित असलेले विधानसभा मतदारसंघ आणि ते मतदारसंघ का हवे आहेत याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना दिली.

 

शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजना या लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचले आहेत यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितले.

 

जागावाटपाबाबत अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचा शब्द दिला. जागावाटपाच्या विषयावर सर्व समन्वयांना मार्ग काढू अशी ग्वाही अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.

 

महायुतीमध्ये विसंवाद आहे अशी भावना लोकांसमोर येऊन देऊ नका, असेही शाह यांनी सांगितले. आपापसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र या आणि एकत्र लढा असा सल्लाही अमित शाह यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *