शिंदे सरकारने चक्क शरद पवारांचे नाव असलेल्या चाळीचे केले नामांतर

The Shinde government changed the name of Sharad Pawar's Chali

 

 

 

नायगाव येथील बी. डी. डी. चाळीला देण्यात आलेले ‘शरद पवार नगर’ हे नाव बदलण्यात आलं आहे, महायुती सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नायगाव येथील चाळीला शरद पवार यांचे नाव नको अशी स्थानिक नागरिकांनी भूमिका घेतल्यानंतर

 

बीडीडी चाळीचं नाव बदल्यात आलं आहे. आता नायगाव बी. डी. डी. चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी. डी. डी. संकुल असं नाव देण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

 

राज्याचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात एक घोषणा केली होती.

 

बीबीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मिटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळींतील डिलाईल रोड भागातील इमारतींना

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार नगर’ नाव देण्याचे आव्हाड यांनी विधानसभेत जाहीर केले होते. त्यानंतर मोठा वादही झाला होता. शरद पवार यांच्यासोबतच वरळीतील इमारतींना ‘बाळासाहेब ठाकरे नगर’

 

आणि नायगावमधीलइमारतींना माजी पंतप्रधान राजीव गांधींचे नाव देण्याचाही निर्णय आव्हाड यांनी घेतला होता. मात्र, आता महायुतीने सरकारने शरद पवारांचे देण्यात आलेले नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच निर्णय घेतला आहे.

 

नायगाव येथील बी.डी.डी. चाळींचे वाचा येथील शासन निर्णयान्वये “बी.डी.डी. चाळ, नायगाव -श्री. शरद पवार नगर” असे नामकरण करण्यात आले होते.

 

स्थानिक लोकप्रतिनीधींनी, नायगाव परिसरहा डॉ. बाबासाहेब आांबेडकर याांच्या पदस्पशाने पावन झालेला नवभाग असून नायगाव बी.डी.डी. चाळ परिसरात डॉ. बाबासाहेब आांबेडकर याांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात राहत आहेत.

 

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आांबेडकर या महापुरुषाचे नाव देणे सामानजक दृष्ट्या योग्य असेल, अशी विनंती केली आहे. त्याअनुषंगाने

 

टनायगाव येथील बी.डी.डी. चाळ पुनर्ववकास प्रकल्पाचे नामाांतरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *