जय शिवसंग्राम संघटनेची मुंबई ठाणे पालघर नवीमुंबई जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

Mumbai Thane Palghar Navimumbai district level review meeting of Jai Shiv Sangram organization concluded

 

 

 

जय शिव संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राम हरी मेटे साहेब यांच्या सूचनेनुसार मुंबई प्रदेश अध्यक्ष
श्री शशिकांत शिरसेकर यांच्या नियोजनात

 

आणि पुढाकाराने, महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. आकाश जाधव आणि मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री.राजेश कदम यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मुख्य प्रवक्ते श्री.दिपक कदम यांच्या अध्यक्षतेखाली

 

जय शिवसंग्राम संघटनेची मुंबई ठाणे पालघर नवीमुंबई मधील जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
बैठकीत खालील मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

 

1)मुंबई ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुंबई मध्ये येणाऱ्या विधान सभा निवडणुकी च्या आधी एक महा मेळावा घ्यायचे निश्चित झाले आहे.

 

1)आगामी होणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीची विधानसभा निहाय नियोजन आणि चाचपणी.
2)विधान सभेची पूर्व तयारी करताना मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या होणाऱ्या

 

 

निवडणुकांमध्ये जय शिवसंग्राम चे उमेदवार संपूर्ण तयारी निशी निवडणुकांच्या मैदानात उतरवायचे.
3)विधान सभेच्या विभागानुसार वॉर्ड आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती विभागात आपले संघटन मजबूत करणे.

 

4)लोकसभे मध्ये युती धर्म पाळून सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कसलीही अपेक्षा न करता भाजप सोबत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.त्याच प्रमाणे या विधानसभेमध्ये पण मान सन्मान पूर्वक युती धर्म पाळायचा आहे..

 

पण असे करत असताना सत्तेतील आपले स्थान हे महायुतीच्या नेत्यांकडून निश्चित करून घ्यायचं आहे.
5)जय शिवसंग्राम ही स्वतंत्र्य संघटना असून मुंबई ठाण्या सह महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यात जोमाने काम करतेय.

 

या सर्व बाबींचा विचार करून भविष्यात संघटना संपूर्ण महाराष्ट्र भर कशी पोहचवता येईल याचा ही गांभीर्याने विचार करण्यात आला.

 

या प्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री शशिकांत शिरसेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात आपल्याला मुंबई महानगर पालिकेमध्ये आपले नगरसेवक कसे निवडून आणता येतील याचे मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रपट विभाग अध्यक्ष श्री.सचिन गायकवाड यांनी केले तर प्रस्तावना.मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री.राजेश कदम जी यांनी केली.श्री.आकाश जाधव यांनी ही मार्गदर्शन केले.

 

चित्रपट विभाग कार्याध्यक्ष श्री.दिनेश सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री.दिपक कदम यांनी संघटनेच्या रचनात्मक बांधणीवर भाष्य केले तसेच भविष्यात आपल्याला..स्वर्गीय मेटे साहेबांचे स्वप्नं पूर्ण करायचे आहे असे नमूद केले.

 

या प्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांचे काम पाहून नवीन जबादाऱ्या दिल्या आणि त्यांची पदोन्नती केली तर काही नवीन लोकांना संघटनेत प्रवेश देऊन त्यांना संघटनात्मक योग्य जबदऱ्या देण्यात आल्या.

 

शिक्षक विभाग अध्यक्ष म्हणून
श्री.श्रावण दामोदर नाटकर
शिक्षणःबी.ए .बी .पी एड.

 

याची निवड करण्यात आली तसेच मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष सौ.अमिता कदम यांना पदोन्नती देत चित्रपट विभाग महिला अध्यक्ष्या पदी निवड एकमुखाने करण्यात आली तर

 

सौ.सोनाली प्रकाश पवार यांची मुंबई महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.श्री.विजय राणे यांना मुंबई उपाध्यक्ष तर श्री.किरण कुडाळकर यांना मुंबई OBC सेल अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.

 

नवी मुंबई मध्ये श्री.नरेंद्र दिलीप पवार यांची निवड करण्यात आली.तसेच श्री.संजय वारेकर यांना ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष पद देण्यात आले.

 

तसेच रोहिदास हिराजी पाटील यांना दहिसर विधान सभा अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली. अश्या प्रकारे संपूर्ण जल्लोषात नवीन पदाधीकार्यांच स्वागत मुंबई प्रदेश तर्फे श्री .शशिकांत जी यांनी केले..

 

या प्रसंगी दक्षिण मुंबई महिला अध्यक्षा श्रीमती.कल्पना रेळे, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री अनिल परब दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री.बिबिषण जी श्री.फिलिप घोरपडे,कैलाश सरोदे,

 

विजय राणे,सोनाली पवार, आकाश जाधव,राजेंद्र सावंत,सचिन गायकवाड,संजय वरेकर,रोहिदास पाटील, प्राध्यापक श्रावण नाटकर,नरेन्द्र पवार,सुनील मोहिते,

 

आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होतेश्री.राजेश कदम तसेच सचिन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *