व्यसनमुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शम्मु पटेल यांची बिनविरोध निवड

Shammu Patel elected unopposed as Chairman of De-addiction Committee

 

 

पिंपरी रोहिला येथील व्यसनमुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बोरी मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शम्मु पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

पिंपरी रोहित येथे 5 ऑक्टोबर वार शनिवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी येथे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते

 

गाव पातळीवर व्यसनांपासून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी शासनाने गाव पातळीवर व्यसनमुक्ती समिती स्थापन केली.

 

व्यसनमुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून, मराठी पत्रकार संघ बोरीचे माजी अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे प्रतिनिधी शम्मु पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, पोलीस पाटील ,चेअरमन ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य ,व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते व समित्या कार्यकारणी आणि ग्रामसभा खेळीने पार पडली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *