एकनाथ शिंदे-अजित पवार या दोघानांही मुख्यमंत्रिपदाची ऑफर

Both Eknath Shinde and Ajit Pawar offered the Chief Minister's post

 

 

 

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.

 

“आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असं पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी शिंदे व पवार या दोघांना मुख्यमंत्रिपदाची खुली ऑफर दिली आहे.

 

आता यावर महायुतीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते.

 

त्यांची नव्या सरकारचं नेतृत्व करण्याची इच्छा होती. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,

 

“आपण सर्वजण होळीचा सण हसत खेळ साजरा करतो. मी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा देतो. तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील शुभेच्छा देतो.

 

त्यांनी राज्यासाठी लढावं असं मला वाटतं. पूर्वी ते भूमिका घ्यायचे आताही तशीच भूमिका घ्यावी, यासाठी मी शुभेच्छा देतो.”

 

दरम्यान, पटोले यांना यावर विचारण्यात आलं की तुम्ही दोन उपमुख्यमंत्र्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांना काय शुभेच्छा देणार? त्यावर पटोले म्हणाले, “त्या दोघांची गत फार वाईट आहे.

 

 

आपल्या पक्ष टिकेल की नाही अशी त्यांची अवस्था आहे, किंवा त्यांच्या मनात भीती आहे. ही भारतीय जनता पार्टी त्यांना जगू देणार नाही. कारण भाजपाची ती सवयच आहे.

 

देशात त्यांनी जिथे-जिथे, ज्या-ज्या पक्षांबरोबर युती केली त्या सर्वांना भाजपाने संपवून टाकलं. आता तुम्ही पाहतच आहात की भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या सर्व योजना बंद केल्या आहेत.

 

 

त्यामुळे मला वाटतं की आता एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी सतर्क व्हायला हवं. आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच.”

 

काँग्रेस आमदार पटोले यांना त्यावर विचारण्यात आलं की तुम्ही त्यांच्यासोबत आहात याचा अर्थ काय? यावर पटोले म्हणाले, “मी त्यांना होळीच्या शुभेच्छा देताना केवळ त्यांच्या सुरक्षेबद्दलची भूमिका मांडली

 

आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं म्हटलं.” त्यावर पटोले यांना पुन्हा विचारण्यात आलं की सोबत आहात म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार की त्यांना तुमच्याकडे बोलवणार?

 

या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले, “अर्थात आम्ही त्यांना आमच्याकडे बोलवणार. कारण आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. “

 

नाना पटोले म्हणाले, “आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू. त्या दोघांचीही तशी इच्छा आहे.

 

अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे आम्ही एकाला काही दिवस आणि दुसऱ्याला काही दिवस असं दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *