राहुल गांधी म्हणाले ; निवडणूक आयोग करतोय मतांची चोरी हा मोठा राष्ट्रद्रोह

Rahul Gandhi said; Election Commission is stealing votes, this is a big treason

bj admission
bj admission

 

रोहित पवारांचा दावा’भाजपाच्या ट्रॅपमध्ये मनसे अडकली

 

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूरवरुन जोरदार चर्चा पार पडली आहे. त्यानंतर आता विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

 

 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. जनतेच्या मतांच्या चोरी करत असून हा सर्वात मोठा राष्ट्रद्रोह असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

 

इराणच्या ऑपरेशनल चाचणीने इस्रायल आणि अमेरिकेला धडकी भरली

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी अलिकडेच निवडणूक आयोगावर खूप गंभीर आरोप केले आहेत.

 

 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मते चोरत’ असल्याचा दावा केला आहे. राहुल म्हणाले की त्यांच्याकडे असलेले पुरावे ‘अणुबॉम्ब’सारखे आहेत, त्यानंतर आयोगाला स्फोट झाल्यानंतर लपण्यासाठी जागा मिळणार नाही.

भारतातील योद्धा कारगिल युद्धात लढला,आता पुण्याचे पोलीस म्हणतात , ‘भारतीयत्व सिद्ध कर नाहीतर…’

संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “मी आधीच अनेक वेळा म्हटले आहे की मते चोरीला जात आहेत. आता आमच्याकडे याचे पूर्णपणे ठोस पुरावे आहेत.

 

निवडणूक आयोग मत चोरीत सहभागी आहे आणि मी हलके बोलत नाहीये, मी १०० टक्के पुराव्यांसह बोलत आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५% करवाढीवर भारत सरकारकडून काय प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असा दावा केला की आम्ही हे जाहीर करताच संपूर्ण देशाला कळेल की आयोग मते चोरत आहे. निवडणूक आयोग हे सर्व भाजपसाठी करत आहे.

 

निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही. काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, “आम्हाला मध्य प्रदेशात (विधानसभा निवडणुकीत) शंका होत्या, लोकसभा निवडणुकीतही शंका होत्या,

 

त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही मतदार जोडले गेले. यानंतर आम्ही आमची चौकशी सुरू केली आणि त्याला सहा महिने लागले.

भारतातील योद्धा कारगिल युद्धात लढला,आता पुण्याचे पोलीस म्हणतात , ‘भारतीयत्व सिद्ध कर नाहीतर…’

आम्हाला जे सापडले आहे तो अणुबॉम्ब आहे, जेव्हा ते स्फोट होईल तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

 

 

राहुल गांधींनी इशारा दिला की मी खूप गंभीरपणे सांगत आहे की निवडणूक आयोगात हे काम जो कोणी करत असेल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, हा देशद्रोह आहे.

 

ईडीचे अधिकाऱ्यांचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश,घरात सापडली कोट्यवधींची कॅश

तुम्ही निवृत्त झाला असाल किंवा तुम्ही कुठेही असाल, आम्ही तुम्हाला शोधून काढू, असा थेट इशारा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने असा दावा करत आहेत की त्यांच्या पक्षाने कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघात मतदार यादीचे ऑडिट केले आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे आणि त्याची माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल.

महाराष्ट्रात लाखो ग्राहक असलेल्या बँकेत मोठा घोटाळा;ग्राहकांचे टेन्शन वाढले

२४ जुलै रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. आयोगाने म्हटले होते की लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने केवळ “निराधार आरोप” केले नाहीत तर एका संवैधानिक संस्थेला “धमकी” देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

 

 

 

Related Articles