राहुल, प्रियांका गांधींसह अनेक खासदारांना अटक, राजकारण तापणार
Many MPs including Rahul, Priyanka Gandhi arrested, politics will heat up


राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनंतर आज इंडिया आघाडीने मोर्च्याचे आयोजन केलं आहे.
इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यास सुरूवात केली. पण पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला.
अनेक खासदांनाही त्यांच्या हातात ‘ सेव्ह व्होट’चे बॅनर्स हाती घेतले आहेत. पण दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला.
इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये ‘सेव्ह व्होट’चे बॅनर्सच हाती घेतले होते.
पण पोलिसांनी या मोर्चाला परवानही दिली नाही. पोलिसांनी संसदेच्या आवारातच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखल्याने खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदारांनी आवारातच पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतलं.
राहुल गांधींचा इशारा;आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही
तृणमुल काँग्रेसच्या महिला खासदारही चांगल्याच आक्रमक झाल्या. अनेकजणी तर थेट पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून निषेध नोंदवू लागल्या. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तर बॅरिकेट्सवर चढून थेट बाहेर पडले आणि निघाले.
पण त्यानांही ताब्यात घेण्यात आले. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरू असल्याचे मत राहुल गांधींनी व्यक्त केलं, तर प्रियांका चतुर्वेदी यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले ‘नरेंद्र मोदींमध्ये नाही दम’ पाहा;Video
मतांची चोरी होत आहे. भाजपच्या आदेशानुसार कामे सुरू आहेत, आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत तर निवडणूक आयोग आमच्यापासून पळ काढत आहे.
आम्ही चोर नाही आहोत. देशाविरोधात नाही तर देश हितासाठी आम्ही बोलत आहोत पण आयोग उत्तर देण्यापासून पळ काढत आहे.
’चोराची डेरिंग बघा ;दिल्लीत महिला खासदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही शांतता मार्गाने लढत राहणार आहोत. महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही पुढे लढत राहु. याशिवाय खासदार डिंपल यादव यांनीदेखील आयोगावर हल्लाबोल केला.
ज्यापद्धतीने मतांची चोरी होत आहे. निवडणुका, उपनिव़णुकांमध्ये ज्या पद्धतीने मतांचा आकडा वाढला आहे. ७७ टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का वाढला आहे.
राहुल गांधींनी सांगितले कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात कशी झाली मतांची चोरी
भाजपच्या मतांचा टक्का ७७ टक्क्यांपर्यंत एवढा वाढला कसा, असा प्रश्न डिंपल यादव यांनी उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोग डोळे झाकून बसले आहे, हेच दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.








