उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा

The alliance between the Thackeray brothers will be announced tomorrow at 12 PM.

 

 

मागील आठवड्यामध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत.

हवामान विभागाने दिला मोठा इशारा;7 राज्यात अलर्ट, मोठं संकट, हाय अलर्ट जारी

मागील अनेक दिवसांपासून दोन्ही भावांमध्ये युतीची चर्चा सुरु होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी युती जाहीर करणार याची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिक्षा लागली होती.

 

अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची तारीख समोर आली आहे. उद्या (दि.24) ठाकरे बंधू त्यांची युती जाहीर करणार आहेत.

जगाचा अंत जवळ आला? पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत;पाहा VIDEO

मुंबई पालिका निवडणुकीची घोषणा झाली असून आजपासून उमेदवारांचे अर्ज दाखल प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर आता ठाकरे बंधू कधी युती जाहीर करणार याची उत्सुकता लागली होती.

 

यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युती जाहीर केली आहे. ‘उद्या १२ वाजता’ असे सूचक ट्वीट करत खासदार संजय राऊत यांनी युतीची घोषणा केली आहे.

‘हिजाब’ वरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. देशाची अर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

 

मागील 25 वर्षांची सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसे पक्षासोबत युती केली. मागील सर्व हेवेदावे विसरुन ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहेत.

अजित पवारांच्या नेता पैशांची बॅग घेऊन मोजतोय कॅश

यापूर्वी हिंदी सक्तीवरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आता निवडणुकीमध्ये देखील एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मराठी मतांचे विभाजन रोखण्यासाठी आणि मराठी मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.

 

ठाकरे बंधूंसमोर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मोठा ट्वीस्ट येणार आहे.

 

रेल्वेने रातोरात बदलले नियम ,RAC तिकिटांबाबत मोठी अपडेट
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंमध्ये सर्व जागांच्या वाटपाबाबत अंतिम चर्चा झाली असून जागावाटप संपले असल्याचे जाहीर केले.

 

खासदार राऊत म्हणाले की, “काल रात्री जागा वाटप पूर्ण झालंय.शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही.

पाहा ;वसमत नगरपरिषद निवडणुकीत सर्वच उमेदवारांना बुथनिहाय पडलेली मते

तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला,” असं संजय राऊतांनी सांगितले.

 

 

Related Articles