तापमान वाढणार; विजांसह पावसाची शक्यता

Temperatures set to rise; possibility of rain accompanied by lightning.

 

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून आता उन्हाची तीव्रता वाढण्याचे संकेत भारतीय हवामान विभाग यांनी दिले आहेत. येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

युद्धामुळे सोयाबीनच्या दरात उसळी ,भाव आणखीन वाढणार

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पुढील दोन दिवसांत किमान तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल.

1 एप्रिलपासून नवे आयकर नियम

तसेच विदर्भात पुढील ४८ तासांत कमाल तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे.

 

मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत २५ व २६ मार्च रोजी उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे या भागातील नागरिकांना घाम व अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे.

 

इराणची हादरवणारी धमकी, जग तणावात
तापमान वाढीबरोबरच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५ व २६ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

 

कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरासह सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

तसेच विदर्भात २६ मार्चपासून पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

रेशनवर मिळणार रॉकेल

 

Related Articles